घरक्रीडाआयसीसीकडून क्रिकेटच्या ८ टुर्नामेंटची घोषणा, दोन दशकांनंतर पाकिस्तानकडे यजमानपद

आयसीसीकडून क्रिकेटच्या ८ टुर्नामेंटची घोषणा, दोन दशकांनंतर पाकिस्तानकडे यजमानपद

Subscribe

पुरूषांच्या टुर्नामेंटबाबत महत्वाची घोषणा...

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसलिलने मंगळवारी पुरूषांच्या टुर्नामेंटबाबत महत्वाची अशी घोषणा केली आहे. आगामी २०२४ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या मालिकांबाबतचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. या वेळापत्रसाठी ११ पुर्ण सदस्यांकडून तसेच तीन सहाय्यक सदस्यांकडून दोन आयसीसी मेन वर्ल्ड कपचे आयोजन करण्याबाबत तसेच चार टी २० वर्ल्ड कप आणि दोन चॅम्पिअन्स ट्रॉफी आयोजनाबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानलाही पहिल्यांदा संधी मिळाली आहे.

पाकिस्तानमध्ये दोन देशातील सामन्यांसाठी वातावरण आता सामन्य होत आहे. अशावेळी पाकिस्तानला २०२५ साठीची चॅम्पिअन्स ट्रॉफी आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताकडे २०२६ चा टी २० विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे. भारतासोबतच श्रीलंकाही या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबत भारत आणि बांगलादेश २०३१ मध्ये ५० षटकांचा वर्ल्ड आणि २०२९ ची चॅम्पिअन्स ट्रॉफी भारतासोबत संयुक्तपणे आयोजन करणार आहे. भारताकडे २०२३ चा क्रिकेट वर्ल्ड कपचे यजमानपद आहे. तर युएसए आणि वेस्ट इंडिजकडे पुरूषांच्या टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या आयोजनाची जबाबदारी असेल. आयसीसीकडून ८ नव्या टुर्नामेंट आणि १२ वेगवेगळ्या देशांकडून आगामी दशकात मालिकांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

२०२७ चा वर्ल्ड कपचे सहयजमानपद हे दक्षिण आफ्रिकेसोबतच झिंबाम्बे, नामिबियाकडे असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडून २०२८ टी २० वर्ल्ड कपचे यजमानपद आहे. तर २०३० मध्ये इंग्लंड, आर्यलंड आणि स्कॉटलंडकडे टी २० वर्ल्डकपचे यजमानपद असणार आहे. पाकिस्तानला जवळपास दोन दशकांनंतर आयसीसी वर्ल्ड कपच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे.

पाकिस्तानने याआधी २०१७ मध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफी फायनल जिंकली होती. त्याआधी श्रीलंकेच्या संघावर झालेल्या २००९ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करायला अनेक देशांनी नकार दिला होता. नुकताच न्यूझीलंड संघानेही पाकिस्तान दौरा रद्द केला होता. तर इंग्लंडनेही दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -