Ind vs Eng Live : विश्वचषकातील भारताचा पहिला पराभव; इंग्लंडचा ३१ धावांनी विजय

World Cup 2019 Ind vs Eng
इंग्लंडची फलंदाजी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज रंगत असून नाणेफेक जिंकून इंग्लंडन फलंदाजी करत आहे. उपांत्य फेरीगाठण्यासाठी अवघा एक विजय हवा असलेली विराट कोहलीची टीम इंडिया आज एजबस्टनच्या मैदानावर उतरली आहे. भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहेभारतीय संघाने या विश्वचषकात एकही सामना गमवला नाही. गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत ११ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.