घरICC WC 2023IND vs NZच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज, भारत काढणार 2019चा वचपा?

IND vs NZच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज, भारत काढणार 2019चा वचपा?

Subscribe

ICC Cricket World Cup 2023 मधील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना हा आज (ता. 15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये खेळला जाणार आहे. 2 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून भारताने आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : ICC Cricket World Cup 2023 मधील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना हा आज (ता. 15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये खेळला जाणार आहे. 2 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून भारताने आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे आजचा हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून सर्वच क्रिकेट प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. आजच्या सामन्याकडे 140 कोटी देशवासियांचे लक्ष आहे. कारण 2019 मध्ये याच न्युझीलंड संघाने भारताचा विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. (ICC Cricket World Cup 2023 Both teams ready for IND vs NZ semi-final)

हेही वाचा – मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ

- Advertisement -

या सामन्यासाठी दोन्ही संघ हे सज्ज झाले आहेत. भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. तर न्यूझीलंडच्या संघातही कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे. भारताने विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये आपली ताकद दाखवून सर्वच संघांना दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवले होते. परंतु, न्यूझीलंडच्या खेळाडूंची कामगिरी पाहता निश्चितच त्यांना कमी लेखता येणार नाही.

तर, या सामन्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असून स्टेडियम संपूर्णतः भरलेले आहे. भारतीय संघच आजचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठणार असल्याची भावना प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी देखील या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि स्टेडियम परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. भारत-न्युझीलंड सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी केली पार्किंगची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणू नयेत, अशा सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -