घर क्रीडा ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार...

ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार पहिला विश्वचषक, वाचा कोण?

Subscribe

ICC Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC Cricket World Cup 2023) भारतीय संघाची आज (5 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेत पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनसह युवा फलंदाज टिलक वर्माला संघातून वगळण्यात आले आहे तर, चार खेळाडू आपला पहिला विश्वचषक खेळताना दिसणार आहेत. (ICC Cricket World Cup 2023 Indian Team Announced Four players will play the first World Cup read who)

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार; ‘या’ दिवशी होणार सामना, पाहा वेळापत्रक

- Advertisement -

5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर 8 ऑक्टोबरला भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल दुखापतीतून सावरला असून तो विश्वचषक संघातून पुनरागमन करणार आहे. याशिवाय इशान किशन, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज हे चार खेळाडू आपला पहिला विश्वचषक खेळताना दिसणार आहेत.

विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

- Advertisement -

‘या’ खेळाडूंना विश्वचषकातून वगळले

रवीचंद्रन आश्विन, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा या खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. टिलक वर्माचा फॉर्म बघता त्याला विश्वचषकात संधी मिळेल, असा अनेक माजी दिग्गजांना विश्वास होता. परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी टिळक वर्माचा अनुभव कमी पडेल यासठी निवड करण्यात आली नसेल. मात्र यंदा भारतात होणार एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण संघाने गेल्या 10 वर्षांपासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकणार का? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे. विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरला सुरूवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अङमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – बुमराहा ‘बाबा’ होताच सोशल मीडियाद्वारे सांगितले बाळाचे नाव

विश्वचषकासाठी भारतीय संघाचे वेळापत्रक

8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू

- Advertisment -