आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर; हार्दिकला फायदा तर रोहित, विराट आणि बुमराहचे नुकसान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नुकताच वनडे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या आणि इमाम उल हक दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) अव्वल स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नुकताच वनडे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या आणि इमाम उल हक दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) अव्वल स्थानी आहे. तसेच, हार्दिक पाड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. (ICC Men ODI Player Rankings Hardik Pandya Rishabh Pant make big gains)

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीनुसार, नुकताच झालेल्या इंग्लंड आणि भारत यांच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना मोठा फायदा झाला आहे. तसेच, भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना एका स्थानानी नुकसान झाले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी न करता आल्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा फटका बसला आहे.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय मालिकेला मुकलेला जसप्रीत बुमराहची आयसीसी गोलंदाज क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. बुमराहच्या जागी आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याने अव्वल स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीत बोल्टने ७०४ गुणांसह पहिल्या आणि बुमराहकडे ७०३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इग्लंडविरुद्ध मागील दोन्ही वनडे सामन्यात दोघांचीही फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. त्यामुळए आयसीसीच्या नव्या क्रमावारीनुसार, रोहित शर्मा पाचव्या आणि विराट कोहलीची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने १३ क्रमांकाची झेप घेत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. हार्दिक पांड्या २४२ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या आणि इमाम उल हक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा रासी व्हेन डर डुसेन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलूंच्या यादीत बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मोहम्मद नबी दुसऱ्या आणि राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘या’ संघांमध्ये रंगणार मिनी आयपीएलचा थरार