घरक्रीडाआयसीसीच्या टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा 'हा' खेळाडू अव्वल स्थानी

आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी

Subscribe

आयसीसीच्या या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांना टी 20 क्रमवारीत फटका बसला आहे. सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांना आशिया चषकात चांगली कामगिरी करता आली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसी क्रमवारीनुसार पाकिस्तानचा स्टार विस्फोटक फलंदाज मोहम्मद रिझवान आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. मोहम्मद रिझवानने बाबर आझमला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. आशिया चषकात मोहम्मद रिझवानने स्फोटक फलंदाजी केली होती. (icc mens rankings mohammad rizwan on first rank)

आयसीसीच्या या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांना टी 20 क्रमवारीत फटका बसला आहे. सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांना आशिया चषकात चांगली कामगिरी करता आली नाही. याचाच फटका त्यांना क्रमवारीत बसला आहे. बाबर आझमचं अव्वल स्थान गेले आहे. तर सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एक हजार दिवसांपासून टी 20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. पण मागील 10 डावात बाबरला चांगली कामगिरी करता आली नाही. मागील 10 डावांत त्याने केवळ 2 अर्धशतकं झळकावता आलेली आहेत. आशिया चषकातही त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बाबरची टी 20 क्रमवारीत घसरण झाली आहे.

मोहम्मद रिझवानने आशिया चषकात स्फोटक फलंदाजी केली आहे. रिझवानने 3 डावांत 192 धावा केल्या. हाँगकाँग विरोधात नाबाद 78 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारताविरोधात 71 धावा केल्या. याच खेळीचा फायदा रिझवानला झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचणारा रिझवान पाकिस्तानचा तिसरा खेळाडू आहे. यामधील मिस्बाह उल हक आणि बाबर आझम यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. बाबर आझम एक हजार 155 दिवस पहिल्या क्रमांकावर होता. तसेच, सूर्यकुमार यादवचा चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण अफ्रिकेचा मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा डेविड मलान पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा क्रर्णधार रोहित शर्मा 14 व्या स्थानावर पोहचला आहे.


हेही वाचा – लज्जास्पद! पाकिस्तानच्या ‘या’ फलंदाजाने बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -