घरक्रीडाICC Men's T20 World Cup : विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका; रैनाची खेळाडूंना...

ICC Men’s T20 World Cup : विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका; रैनाची खेळाडूंना साद

Subscribe

विराट कोहलीसाठी टी-२० विश्वचषक जिंका, अशी साद भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने घातली आहे. कोहलीने विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० चे कर्णधारपद सोडणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे कोहली कर्णधार असताना विश्वचषक भारताने जिंकावा अशी इच्छा सुरेश रैनाची आहे.

कर्णधार म्हणून या स्पर्धेत ही कदाचित कोहलीची शेवटची संधी आहे. त्यामुळे आपण विश्वचषक जिंकू असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण करणे कोहलीसाठी महत्त्वाचे आहे, असे रैना म्हणाला. भारतीय चाहते आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक २०२१ साठी या उत्साहित आहेत. कारण आपल्याकडे विश्वचषक जिंकवून देतील असे खेळाडू आहेत. भारताला फक्त स्पर्धेमध्ये योजना अंमलात आणण्याची गरज आहे. आपले सर्व खेळाडू अलीकडेच युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग खेळले आहेत आणि ते या वातावरणात आठते नऊ सामने खेळले आहेत, असे रैना म्हणाला.

- Advertisement -

युएईमध्ये सामने खेळल्यामुळे भारत सर्व संघांपैक्षा वरचढ ठरतो. त्यामुळे माझ्या मते भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठी एक उत्तम उमेदवार आहे, असे रैना म्हणाला. युएईमधील परिस्थिती आपण भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळतो त्यासारखीच आहे. आशियाई संघांना येऊन त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याची ही चांगली संधी आहे, असे देखील रैनाने सांगितले.

स्पर्धेत इतर अनेक चांगले संघ आहेत. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देखील चांगले दिसत आहेत आणि टी-२० क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. माझ्यासाठी भारताची फलंदाजी ही यशाची गुरुकिल्ली आहे. रोहित शर्मा एक मोठा खेळाडू आहे. त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्याकडे आयपीएलचा देखील चांगला अनुभव आहे, असे रैना म्हणाला.

- Advertisement -

रोहित, केएल राहुल आणि विराटला १५ षटकांपर्यंत फलंदाजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे भारताला चांगली लय मिळेल. मधल्या फळीत खूप स्फोटक फलंदाज आहेत. साहजिकच रिषभ पंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहत. हार्दिक पांड्या पॉवर हिटर म्हणून खूप सक्षम आहे. परंतु जर पहिले फलंदाज खेळपट्टीवर टीकून राहिले तर कोणतेही लक्ष्याचा भारतीय संघ पाठलाग करु शकतो, असा दावा सुरेश रैनाने केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -