घरक्रीडाबुमराहने अव्वल स्थान गमावले!

बुमराहने अव्वल स्थान गमावले!

Subscribe

आयसीसी एकदिवसीय क्रमवारी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकही विकेट मिळवता आली नाही. याचा फटका त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत बसला आहे. बुमराहने गोलंदाजांच्या यादीतील आपले अव्वल स्थान गमावले असून त्याची जागा न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने घेतली. बोल्ट दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नाही.

मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर दुखापतीमुळे बुमराहला चार महिने मैदानाबाहेर रहावे लागले होते. त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेट न खेळताच भारतीय संघात पुनरागमन केले. यावर्षी बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन असे एकूण सहा एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याला केवळ १ विकेट मिळवता आली आहे. त्यामुळेच एकदिवसीय क्रमवारीत त्याची दुसर्‍या स्थानी घसरण झाली. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार बुमराहच्या खात्यात ७१९ गुण असून अव्वल स्थानी पोहोचलेल्या बोल्टचे ७२७ गुण आहेत.

- Advertisement -

अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रविंद्र जाडेजाला तीन स्थानांची बढती मिळाली आहे. तो २४६ गुणांसह सातव्या स्थानी पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन डावांत ६३ धावा करताना २ गडी बाद केले. या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर असून त्याचे ३०१ गुण आहेत.

फलंदाजांत कोहलीच नंबर वन!

भारताचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांत केवळ ७५ धावा करता आल्या. मात्र, असे असतानाही त्याने फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात ८६९ गुण आहेत. न्यूझीलंड मालिकेला मुकणारा रोहित शर्मा दुसर्‍या आणि पाकिस्तानचा बाबर आझम तिसर्‍या स्थानावर आहे. भारताविरुद्ध एका शतकासह १९४ धावा करणार्‍या न्यूझीलंडच्या रॉस टेलरला एका स्थानाची बढती मिळाली. तो ८२८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -