घरक्रीडाचोरांचा ICCला 'जमतारा' स्टाइल गंडा; 21 कोटींचा लावला चुना

चोरांचा ICCला ‘जमतारा’ स्टाइल गंडा; 21 कोटींचा लावला चुना

Subscribe

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध 'जमतारा' वेब सीरिज सर्वांनाच माहिती आहे. या वेब सीरिजमध्ये फिशिंगद्वारे फसवणूक करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच फिशिंगचा फंडा वापरत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सायबर चोरांनी तब्बल २१ कोटींचा ऑनलाइन चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध ‘जमतारा’ वेब सीरिज सर्वांनाच माहिती आहे. या वेब सीरिजमध्ये फिशिंगद्वारे फसवणूक करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच फिशिंगचा फंडा वापरत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सायबर चोरांनी तब्बल २१ कोटींचा ऑनलाइन चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबई कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, आयसीसीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती ‘क्रिकबझ’ने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही सायबर चोरांनी आयसीसी सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केला आणि फेडरेशनच्या चीफ फायनान्स ऑफिसरकडं (CFO) पेमेंटसाठी व्हाउचरची मागणी केली. विशेष म्हणजे आयसीसीमधील कोणीही वेगवेगळ्या बँकांच्या खाते क्रमांकाकडे लक्ष दिले नाही. (icc online fraud jamtara like scandal happened with icc becomes victim of online fraud near 21 crore)

- Advertisement -

याप्रकरणी आयसीसीचे अधिकारी आता अमेरिकेतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चा करत असल्याचे समजते. मात्र अधिकृतपणे याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, 21 कोटींच्या या फसवणुकीनंतर आयसीसीच्या दुबई कार्यालयातील मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) आणि त्यांचा विभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

दरम्याना, याआधीही आयसीसीची फसवणूक करण्यात आली होती. मात्र, या फसवणुकीनंतर आयसीसीने कुठलीही खबरदारी घेतली नव्हती. तसेच, आरोपींविरोधात कारवाई देखील केली नव्हती, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, नुकताच आयसीसीचा एक घोळ समोर आला होता. आयसीसीच्या एका चुकीमुळे दोन तासांतच होत्याचे नव्हते झाले होते. आयसीसीने दुपारच्या सुमारास कसोटी संघाची ताजी क्रमवारी जारी केली होती. त्यावेळी आयसीसीने भारतीय संघाला नंबर-१ घोषित केले होते. मात्र, दोन तासानंतर पुन्हा एकदा म्हणजेच दुपारी ४ वाजताच्या सुमारास आयसीसीने भारतीय संघाची घोषणा करत नंबर-२ च्या स्थानावर असल्याचे सांगितले. आयसीसीच्या याच घोळामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.


हेही वाचा – आयसीसीच्या घोळामुळे दोन तासांत झालं होत्याचं नव्हतं, भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -