Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा 'किंग इज बॅक' : भारताच्या विजयानंतर आयसीसीकडून रनमशीन कोहलीचा खास फोटो पोस्ट

‘किंग इज बॅक’ : भारताच्या विजयानंतर आयसीसीकडून रनमशीन कोहलीचा खास फोटो पोस्ट

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आज सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रनमशीन विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी करत ५३ चेंडूत ८३ धावा काढल्या. विराट कोहलीनं सुरुवातीला संयमी केली. त्यानंतर कोहलीच्या विजयाच्या फटाकेबाजीला सुरूवात झाली. अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत विराटने भारताला विजय मिळवून दिला. या उत्तुंग खेळीनंतर विराटचं सोशल मिडियावर कौतुक केलं जात आहे.

आयसीसीनं विराट कोहलीसाठी खास ट्वीट केलं आहे. आयसीसीनं विराट कोहलीचा पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीचा सिंहासनावर बसलेला फोटो आयसीसीने पोस्ट केला आहे. या फोटोसोबत आयसीसीनं ‘विराट कोहली इज बॅक’ असं म्हटलं आहे. तसेच कोहलीला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

विराट कोहलीनं १५४.७१ च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं चार षटकार आणि सहा चौकार लगावले. हार्दिक पांड्यासोबत विराट कोहलीनं शतकी भागिदारी केली. दोघांनीही ११३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय झाला.


- Advertisement -

हेही वाचा : अटीतटीच्या लढतीत भारताचा 4 विकेट्सनी पाकिस्तानवर विजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -