घरक्रीडाआयसीसीचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका

आयसीसीचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे नुकसान भरपाई म्हणून ४४७ करोड रुपये देण्याची मागणी केली होती.

बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यामधील वाद अखेर संपला आहे. भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत. त्यामुळे आमचे खूप आर्थिक नुकसान होत असल्याचे म्हणत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली होती. आयसीसीने याप्रकरणी एक समिती नेमली होती. या समितीला भारताची बाजू पटल्यामुळे त्यांनी पाकिस्तानची याचिका फेटाळून लावली आहे.

नुकसान भरपाई म्हणून ४४७ करोडची मागणी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिकेसाठी करार झाला होता. त्यानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत भारत आणि पाकिस्तानमध्ये ६ मालिका होणे अपेक्षित होते. पण या कराराचा भारताने मान न राखल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकसान भरपाई म्हणून ४४७ करोड रुपये देण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने ही मागणी फेटाळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीचे दार ठोठावले होते.

तीन दिवस सुनावणी

आयसीसीने याप्रकरणी एक समिती नेमली होती. या समितीने बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी तीन दिवस सुनावणी करण्यात आली आणि भारत पाकिस्तानला नुकसान भरपाई देणार नाही, असा निर्णय या समितीने घेतला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -