घरक्रीडाICC: शुभमन गिल नंबर-1 फलंदाज; बाबर आझमची 'बादशाहत' काढली मोडीत

ICC: शुभमन गिल नंबर-1 फलंदाज; बाबर आझमची ‘बादशाहत’ काढली मोडीत

Subscribe

भारतीय फलंदाज शुभमन गिल आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी दुपारी एकदिवसीय क्रमवारी अपडेट केली आहे.

भारतीय फलंदाज शुभमन गिल आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी दुपारी एकदिवसीय क्रमवारी अपडेट केली आहे. 950 दिवस पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडून भारतीय सलामीवीर गीलने ‘बादशाहत’ हिसकावून घेतली आहे. मात्र, दोन्ही फलंदाजांच्या मानांकन गुणांमध्ये फारसा फरक नाही. बाबर आझमचे 824 रेटिंग रँकिंग आहेत, तर शुभमन गिलचे 830 गुण आहेत. (ICC Shubman Gill No 1 batsman Babar Azam s Badshah was removed by ‌Indian Prince Gill )

2023 च्या विश्वचषकादरम्यान भारतीय सलामीवीरासाठी हा एक मोठा बूस्ट आहे. या विश्वचषकात त्याचा फॉर्म तितकासा चांगला राहिला नाही, पण त्याने काही प्रसंगी चांगली खेळी केली आहे. त्याचवेळी बाबर आझमला आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याशिवाय भारतीय फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट दीर्घकाळापासून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

- Advertisement -

शुभमन गिलबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2023 च्या विश्वचषकातील 6 डावांमध्ये दोन अर्धशतकांसह एकूण 219 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 36.50 आहे, तर त्याने 30 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. बाबर आझमने या विश्वचषकात 8 डावात 4 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 282 धावा केल्या आहेत. बाबरच्या बॅटमधून 26 चौकार आणि 4 षटकार आले. या स्पर्धेत बाबरचा स्ट्राइक रेट 82.69 आहे, तर शुभमन गिलचा स्ट्राइक रेट 96.90 आहे.

गोलंदाजीत सिराज नंबर वन

मोहम्मद सिराज सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सिराजच्या खात्यात 709 तर महाराजांच्या खात्यात 694 गुण आहेत. अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर शाकिब अल हसन बराच काळ अव्वल स्थानावर आहे, तर ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावून चार स्थानांनी झेप घेतली आहे. मॅक्सवेल सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Glenn Maxwell : मॅक्सवेल बनला ‘रन मशिन’; त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळीने केलेले 10 विक्रम जाणून घ्या )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -