आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल

आयसीसीची टी-20 क्रमवारी नुकताच जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतील फलंदाजाच्या यादीत भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवचे 859 रेटिंग गुण आहेत.

आयसीसीची टी-20 क्रमवारी नुकताच जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतील फलंदाजाच्या यादीत भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवचे 859 रेटिंग गुण आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याच्यापेक्षा 23 गुणांनी पुढे आहे. रिझवानचे 836 रेटिंग गुण आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला या क्रमवारीत मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. (ICC T20 Rankings Suryakumar Yadav Remains On Top Hardik Also In Top Five In All Rounder Ranking)

आयसीसीच्या या क्रमवारीत सूर्यकुमार यादवशिवाय भारताचा दुसरा कोणताही फलंदाज टॉप-10मध्ये नाही. माजी कर्णधार विराट कोहली 11व्या स्थानावर आहे. सूर्यकुमारने या टी-20 विश्वचषकातील पाच डावात 3 अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याने सर्वधिक 869 रेटिंग गुण मिळवले. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याला केवळ 14 धावा करता आल्या. त्यामुळे त्याचे 859 रेटिंग गुण आहेत.

सूर्यकुमार यादवने या विश्वचषकात 59.75च्या सरासरीने आणि 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या. या खेळीमुळे सूर्यकुमार या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला.

यंदाच्या टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीतही बरीच कमाई केली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत 47 चेंडूत नाबाद 86 धावा करणाऱ्या अॅलेक्स हेल्स 22 स्थानांची झेप घेत 12व्या स्थानी पोहोचला आहे. या विश्वचषकात हेल्स इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. टी-20 विश्वचषकात त्याने 42.40 च्या सरासरीने 212 धावा केल्या. या वर्षाच्या सुरुवातीला पुनरागमन केल्यापासून हेल्स चमकदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 2022 मध्ये 30.71 च्या सरासरीने आणि 145.27 च्या स्ट्राइक रेटने 430 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे चौथ्या आणि एडन मार्कराम पाचव्या स्थानावर आहे. बाबर आझम आणि रिले रुसो यांनाही टॉप 10 मध्ये फायदा झाला आहे. बाबरने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले आणि तो एका स्थानाने पुढे जाऊन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सच्या पुढे आठव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसीच्या अष्टपैलूच्या क्रमवारीत हार्दिक पंड्या टॉप 10मध्ये सामील झाला आहे. हार्दिक पांड्या तिसऱ्या स्थानावर असून, हार्दिक आणि सूर्यकुमार यांच्याशिवाय कोणताही भारतीय खेळाडू टी-20च्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये नाही. तसेच, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल तीन स्थानांवर आहेत

आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या आदिल रशीदने सर्वाधिक कमाई केली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. राशिनने भारताविरुद्ध 1/20 आणि पाकिस्तानविरुद्ध 2/22 घेतले. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे.

इंग्लंडच्या सॅम करनने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 12 धावांत 3 विकेट घेतल्या आणि तो सामनावीर ठरला. त्याला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा अव्वल स्थानावर कायम आहे. तर राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा – यंदाचा फिफा फूटबॉल विश्वचषक कतारमध्ये रंगणार; १७ लाख कोटींचा खर्च, कडक सुरक्षाव्यवस्था