ICCने केली टी20 टीम ऑफ द ईयरची घोषणा, या स्टार भारतीय खेळाडूंचा समावेश

आईसीसी (ICC) ने टी20 टीम ऑफ द ईयर (ICC T20 Team of the Year) ची घोषणा केलीय. गत सालाच्या कामगिरीच्या आधारे या टीमची घोषणा करण्यात आली असून यात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले .विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांना जागा देण्यात आलीय. यात पाकिस्तान आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन खेळाडू त्याचबरोबर न्यूझीलंड, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.

T20 विश्वचषकात विराट कोहली उत्तम फॉर्ममध्ये होता (Virat Kohli finished as the highest run-scorer in the competition) त्याने मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात सर्वात मोठी T20I इनिंग खेळली होती. त्याने T20 विश्वचषकात आणखी तीन अर्धशतके झळकावली आणि 296 धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून स्पर्धेचा शेवट केला.

भारत T20 विश्वचषक जिंकू शकला नव्हता आणि त्यात इंग्लंडचा हात होता. इंग्लंडने भारताला वन साईडेड हरवले होते व फायनल मध्ये एंट्री केली होती. फायनल मध्ये ही पाकिस्तानला पराभूत करून टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता . इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात कॅप्टन जॉस बटलर (Jos Buttler) ने महत्वाची भूमिका बजावली होती. यानंतर जॉस बटलरचे 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या यादीत कर्णधार म्हणून नाव देण्यात आले आहे.

भारताचा सूर्यकुमार यादव गेल्या वर्षी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 31 सामन्यांत 187.43 च्या स्ट्राइक रेटने आणि 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि नऊ अर्धशतके झाली.

विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. कोहलीने 20 सामन्यांमध्ये 55 पेक्षा जास्त सरासरी आणि 138 च्या स्ट्राइक रेटने 781 धावा केल्या. यादरम्यान त्याने पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतकही झळकावले आणि तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळही संपवला.

हार्दिक पांड्यानेही गेल्या वर्षी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ दाखवला आणि त्याने 607 धावा केल्या आणि 20 विकेट्स घेतल्या.

झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यासाठी २०२२ हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने अनेक संस्मरणीय कामगिरी केली आहे आणि म्हणूनच आयसीसीने त्याला त्याच्या टी-20 संघात स्थान दिले आहे. रझाने गेल्या वर्षी 735 धावा केल्या होत्या आणि 25 विकेट्सही घेतले होते.

आयर्लंडचा जोशुआ लिटल (Joshua Little) गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. त्याने 26 सामन्यात 7.58 च्या इकॉनॉमी रेटने 39 विकेट घेतल्या.