Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ICC T20I WORLD CUP : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

ICC T20I WORLD CUP : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

Related Story

- Advertisement -

पाच वर्षांनतर होऊ घातलेल्या बहुप्रतिक्षित आयसीसी टी-२० विश्वचषकाच आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. भारतीय संघ निवडीसाठी चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी समितीची व्हर्चुअल बैठक पार पडली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री देखील होते. बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली.आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोणत्या खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

यंदाच्या टी -२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे परंतु कोरोना महामारी मूळे सामने भारतात न होता विश्वचषकाचे सामने यूएई, ओमान, अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. १७ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार रंगणार आहे, जगभरातील क्रिकेट रसिकांच लक्ष या विश्वचषकाकडे लागले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली.

- Advertisement -

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी

- Advertisement -

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दिपक चहर


हेही वाचा : ICC T20I WORLD CUP 2021 : ओमानसाठी ऐतिहासिक क्षण

- Advertisement -