ICC Test Ranking : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारताची पहिल्या स्थानी झेप, पण पाकिस्तानचा विजय महत्त्वाचा का?

ICC Test Ranking : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारताची पहिल्या स्थानी झेप, पण पाकिस्तानचा विजय महत्त्वाचा का?

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला २-० अशा फरकाने पराभूत केल्यामुळे भारतीय संघ रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा भारताचे स्थान घेऊन क्रमांक १ चा संघ होऊ शकतो. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कराचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या निकालावर कसोटीचा नंबर वन संघ कोणता हे निश्चित होणार आहे. ऑस्ट्रेलिया सामना जिंकल्यावर नंबर वन होईल आणि दुसरीकडे पाकिस्तान जिंकल्यावर भारत पहिल्या स्थानावर येईल.

आयसीसीने २ मार्च रोजी जाहीर केलेल्या अधिकृत रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ११९ अंकांनी पहिल्या स्थानावर आहे. तर भारताकडे ११६ अंक असून दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसी बुधवारी रॅकिंग जारी करते यामध्ये एका आठवड्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरी आणि खेळण्यात आलेल्या सामन्यांच्या आधारावर क्रमवारी ठरवली जाते. १६ मार्चला जारी करण्यात आलेल्या क्रमवारीत भारत-श्रीलंका आणि पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांच्या आधारावर बदल करण्यात येतील. यादरम्यान भारत पहिल्या स्थानी राहू शकतो.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्याच्या निकालानंतर क्रमवारी निश्चित होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकल्यास भारत दुसऱ्या स्थानी पोहचेल आणि ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानी जाईल. तर पाकिस्तानचा संघ ६ व्या स्थानी पोहचेल. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. परंतु भारत पुन्हा क्रमवारीतील पहिले स्थान ऑस्ट्रेलियाकडून हिसकावून घेतले जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा विजय महत्त्वाचा

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्याच्या मालिकेतील तिन्ही सामने अनिर्णित राहिले तरीही भारत आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर जाईल. या स्थितीत भारताचे ११६ गुण होतील, तर ऑस्ट्रेलियाचे ११५ गुण होतील. त्याचवेळी, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक सामना जिंकला तरीही परिस्थिती तशीच राहील आणि भारत आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहील. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला असून दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने तिसरा कसोटी सामना जिंकला तरच भारत पहिल्या स्थानावर राहील, यामुळे अशीच प्रार्थना भारतीय चाहत्यांना करावी लागणार आहे.


हेही वाचा : पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा