घरक्रीडाICC Test Ranking : कसोटी क्रमवारीच्या टॉप ५ मध्ये शाहीन आफ्रिदीची झेप;...

ICC Test Ranking : कसोटी क्रमवारीच्या टॉप ५ मध्ये शाहीन आफ्रिदीची झेप; बुमराहची झाली घसरण

Subscribe

आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवारी कसोटी क्रमवारीची यादी जाहीर करण्यात आली

आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) बुधवारी कसोटी क्रमवारीची यादी जाहीर करण्यात आली. गोलंदाजीमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने चांगलीच मुसंडी मारली आहे. शाहीन आफ्रिदीने पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे. तर काइल जेमिसनचे पहिल्या १० मध्ये आगमन झाले आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची एका पाऊलावरून घसरण झाली आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानने १० बळी राखून पराभव केला होता. त्या सामन्याचा हिरो देखील शाहीन आफ्रिदीच होता. तर जूनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत काइल जेमिसनने आक्रमक गोलंदाजी करून भारताचा पराभव केला होता.

शाहीन आफ्रिदेने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशविरूध्दच्या कसोटी सामन्यात ७ बळी पटकावून संघाला विजय मिळवून दिला होता. बदल्यात त्याने क्रमवारीत चांगलीच मुसंडी मारून ५ व्या नंबरवर स्थान मिळवले आहे. तर काइल जेमिसनने ६ पाऊलांनी मोठी उडी घेत ९ व्या स्थानावर मजल मारली. लक्षणीय बाब म्हणजे जेमिसनने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. त्यामुळे बुमराहची ९ व्या स्थानावरून १० व्या स्ठानी घसरण झाली आहे.

- Advertisement -

तर गोलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्र्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अव्वल स्थानावर कायम आहे. तर भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साउदी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लाथम आणि श्रीलंकेच्या दिमुथ करूणारत्ने फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी मुसंडी मारली आहे. दोन्हीही खेळाडूंनी फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये प्रवेश मिळवला आहे. लाथमने ९ व्या स्थानावर तर करूणारत्नेने ७ व्या नंबरवर मजल मारली आहे.


हे ही वाचा: http://World Badminton : वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणार सायना नेहवाल, काय आहे कारण ?


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -