घरक्रीडाICC Test Ranking : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर; अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा...

ICC Test Ranking : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर; अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल स्थानी

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नुकताच कसोटी क्रिकेट क्रमवारी जाहिर केली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानी कायम आहे. तसेच, आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल 10 खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये कोणताही बदल झालेले नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नुकताच कसोटी क्रिकेट क्रमवारी जाहिर केली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानी कायम आहे. तसेच, आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल 10 खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये कोणताही बदल झालेले नाही. या क्रमवारीच्या पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन कायम आहे. तसेच, हिट-मॅन आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानी आहे. तसेच, माजी कर्णधार आणि रन मशीन विरोट कोहली दहाव्या स्थानी आहे.

बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिला कसोटी सामना (Test Match) अनिर्णित ठरल्यानं कसोटी क्रमवारीतील अव्वल दहा (Top 10) खेळाडूंच्या रँकीगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. शिवाय, आयसीसीच्या कसोटी क्रमवारीच्या गोलंदाजाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस 901 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, त्याचे दुसऱ्या स्थानी भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे. तिसऱ्या स्थानी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पाकिस्तानचा प्रशिक्षक; ‘हा’ खेळाडू देणार प्रशिक्षण

दरम्यान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) सीरीजचा सामना खेळण्यात आला. त्यामुळे याआदीच्या आणि सध्याच्या आयसीसीच्या क्रमवारीत या दोन देशांतील खेळाडूंनीच गुण मिळवले आहेत. पहिल्या कसोटीत बांगलादेशच्या एकमेव डावात 88 धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याला तीन स्थानांनी आघाडी मिळाली असून, तो 17 व्या स्थानावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : रोहित-विराटच्या फॉर्मवर सौरभ गांगुलीने सोडलं मौन, म्हणाला…

या सामन्यात सामनावीर ठरलेल्या मॅथ्यूजने पहिल्या डावात 199 धावा केल्याने त्याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो 21व्या स्थानावर पोहचला आहे. तसेच, आयसीसीच्या साप्ताहिक कसोटी रँकिंगमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीम आणि पहिल्या कसोटीत शतके झळकावणाऱ्या तमिम इक्बाल यांना फायदा झाला आहे. 105 धावांच्या जोरावर मुशफिकुरनं चार स्थानांनी प्रगती करत 25व्या स्थानावर झेप घेतली आहे. तमिमला सहा स्थानांचा फायदा झाला असून तो 27 व्या स्थानावर पोहचला आहे. तमिमनं 133 धावांची खेळी खेळली.


हेही वाचा – LSG vs RCB : रजत पाटीदारची शतकीय खेळी, लखनौ संघासमोर २०८ धावांचे आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -