घरक्रीडाICC Test Ranking: विराटने चौथे स्थान गमावले, बुमराहला सहाव्या स्थानाचा फायदा, जडेजा...

ICC Test Ranking: विराटने चौथे स्थान गमावले, बुमराहला सहाव्या स्थानाचा फायदा, जडेजा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला

Subscribe

आयसीसी क्रमवारीत श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेलाही फायदा झाला. बुमराहने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, न्यूझीलंडचा काईल जेम्सन, टीम साऊथी आणि नील वॅग्नर याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले.

नवी दिल्लीः भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केलीय. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सहाव्या स्थानी संधी मिळालीय. तसेच विराट कोहलीला चार स्थानांचे नुकसान झाले असून, फलंदाजांच्या क्रमवारीत तो नवव्या स्थानावर घसरलाय. मोहाली कसोटीत 175 धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजालाही नुकसान झाले असून, तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. याशिवाय आयसीसी क्रमवारीत श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेलाही फायदा झाला. बुमराहने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, न्यूझीलंडचा काईल जेम्सन, टीम साऊथी आणि नील वॅग्नर याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर परिणाम

जसप्रीत बुमराहने बंगळुरू कसोटीत श्रीलंकेविरुद्ध आठ विकेट घेतल्या होत्या. मायदेशात पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला होता. यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत सहा स्थानांचा फायदा झाला. दुसरीकडे मोहम्मद शमी एका स्थानाने पुढे सरकत 17व्या स्थानावर पोहोचला. श्रीलंकेच्या लसिथ एम्बुल्डेनिया आणि जयविक्रमाला पाच स्थानांचा फायदा झाला. अंबुलडेनिया 32व्या तर जयविक्रम 45व्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या, रविचंद्रन अश्विन दुसऱ्या आणि कागिसो रबाडा तिसऱ्या स्थानावर राहिला.

- Advertisement -

फलंदाजांमध्ये विराटचा तोटा, करुणारत्नेचा फायदा

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने फलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 107 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली नवव्या स्थानावर आलाय. पाकिस्तानचा बाबर आझम आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन अव्वल स्थानावर कायम आहे. जो रूट दुसऱ्या, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि केन विल्यमसन चौथ्या स्थानावर आहे.

अय्यर आणि बूनर यांची मोठी झेप

वेस्ट इंडिजचा बूनर आणि भारताचा श्रेयस अय्यर यांनी मोठी उडी मारली. बूनरला 22 स्थानांची तर अय्यरला 40 स्थानांची वाढ झाली. आता बूनर 22व्या आणि अय्यर 37व्या स्थानावर गेलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत बूनरने 123 आणि नाबाद 38 धावा केल्या. त्याचवेळी अय्यरने 92 आणि 67 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या जॅक क्रॉलीने 121 धावा केल्या होत्या आणि त्याला 13 स्थानांचा फायदा झाला होता. तो 49 व्या स्थानावर आलाय.

- Advertisement -

अष्टपैलू खेळाडूंमध्ये जेसन होल्डर अव्वल

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर पुन्हा एकदा जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू बनलाय. त्याने रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. जडेजा दुसऱ्या, अश्विन तिसऱ्या, शाकिब अल हसन चौथ्या आणि बेन स्टोक्स पाचव्या स्थानावर आहे.


हेही वाचाः Babar Azam Vs Virat Kohli : बाबर आझमची 2 वर्षांनंतर शतकी खेळी, पण विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -