घरक्रीडाIcc Test Rankings : रवींद्र जाडेजाची अफलातून कामगिरी, विराट-रोहितला दिला मोठा धक्का

Icc Test Rankings : रवींद्र जाडेजाची अफलातून कामगिरी, विराट-रोहितला दिला मोठा धक्का

Subscribe

टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाने मोहालीमध्ये श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. तसेच कसोटी सामन्यात जाडेजाने एकूण नऊ विकेट्स घेतल्या. परंतु अफलातून कामगिरीमुळे जाडेजाने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. आयसीसीच्या कसोटीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जाडेजाने पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

मोहाली कसोटीत जाडेजाने पहिल्या डावात नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. जाडेजाच्या रँकिंगमध्ये थेट १७ स्थानांची सुधारणा झाली आहे. फलंदाजाच्या रँकिंगमध्ये जाडेजा ३७ व्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात जाडेजाने दमदार प्रदर्शन केल्यामुळे तो ऑलराऊंडर पुरूष खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जाडेजाने २२८ बॉलमध्ये १७८ चौकार आणि ३ खणखणीत षट्कार लगावले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ५ आणि ४ अशा एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. जाडेजाला त्याच्या उत्तम कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जाडेजाने वेस्टइंडिजच्या जेसन होल्डरला पछाडत ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. विराट २ स्थानावरून थेट ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर कर्णधार रोहित शर्मा ६ व्या स्थानी कायम आहे.


हेही वाचा : Jammu-Kashmir Blast: जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये स्फोट, १ ठार तर १३ जण जखमी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -