घरक्रीडाTest Rankings : रिषभ पंतची सातव्या स्थानी झेप, अश्विन दुसऱ्या स्थानी 

Test Rankings : रिषभ पंतची सातव्या स्थानी झेप, अश्विन दुसऱ्या स्थानी 

Subscribe

फलंदाजांमध्ये पंत आणि रोहित शर्मा हे दोघेही सातव्या स्थानावर आहेत.

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. भारताने नुकत्याच झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ३-१ असे पराभूत केले. भारताच्या या यशात महत्वाची भूमिका बजावणारा भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अश्विनने या मालिकेच्या चार सामन्यांच्या आठ डावांमध्ये सर्वाधिक ३२ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्यानेच मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. तसेच नुकताच त्याला आयसीसीचा फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला होता. आता त्याला क्रमवारीत एका स्थानाची बढती मिळाली असून तो गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

पंत, रोहित सातव्या स्थानावर

फलंदाजांमध्ये रिषभ पंत आणि रोहित शर्मा हे दोघेही सातव्या स्थानावर आहेत. रोहित, पंत आणि न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज हेन्री निकोल्स या तिघांचेही ७४७ गुण असल्याने ते संयुक्तरित्या सातव्या स्थानी आहेत. रोहित आणि पंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित (३४५ धावा) दुसऱ्या, तर पंत (२७० धावा) तिसऱ्या स्थानावर होता. तसेच पंतने अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटीत शतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याला फलंदाजांच्या यादीत सात स्थानांची बढती मिळाली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -