घरक्रीडाICC U-19 WC 2022: इंग्लंडचा अफगाणिस्तानवर विजय, अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक

ICC U-19 WC 2022: इंग्लंडचा अफगाणिस्तानवर विजय, अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक

Subscribe

इंग्लंड संघाच्या या सामन्यात रेहान अहमदने सहा षटके टाकत ४१ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. रेहान व्यतिरिक्त थॉमस ऍस्पिनवाल यांना दोन आणि जोशुआ बॉयडेन आणि कॅप्टन पर्स्ट यांना अनुक्रमे एक यश मिळाले.

आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचा पहिली उपांत्य फेरी मंगळवारी खेळवण्यात आली. या फेरीमध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या अंडर-१९ संघांमध्ये सामने खेळवण्यात आले. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाला डी/एल मेथडच्या अंतर्गत १५ धावांनी विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे पावसामुळे ५०-५० च्या षटकांऐवजी ४७-४७ षटकांचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंड संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या संघाने ठराविक षटकांमध्ये ६ विकेट गमावत २३१ धावा केल्या होत्या.

संघासाठी जॉर्ज बेलने ६७ चेंडूत ६ चौकारांसह ५६ धावा नाबाद केल्या आहेत. तर जॉर्ज थॉमसने खेळाची सुरुवात करताना 69 चेंडूमध्ये ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. या खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडच्या संघातील जैकब बेथेलने ६ चेंडूत दोन धावा, कर्णधार टॉम प्रेस्टने २६ चेंडूत २ चौकारच्या मदतीने १२ धावा केल्या. विलियम लक्सटनने १५ चेंडूत ११ धावा, रेहान अहमदने ४४ चेंडूत १६ धावा आणि विकेटकीपर गोलंदाज एलेक्स हॉर्टन ३६ चेंडूत ५ चौके आणि १ षटकारच्या मदतीने ५३ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानच्या संघासाठी नवीन जादरान नूर अहमदने अनुक्रमे दोन -दोन गडी बाद केले. तर नांगेयलिया खरोटे आणि इजहारुलहक नवीदने अनुक्रमे एक-एक गडी बाद केले आहेत.

- Advertisement -

इंग्लंडच्या संघाकडून देण्यात आलेल्या २३२ धावांच्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ निर्धारित षटकात ९ गडी गमावून २१५ धावाच करू शकला. संघासाठी अल्लाह नूरने ८७ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६० धावांची सर्वोच्च अर्धशतकी खेळी खेळली. मात्र, संघाला विजयाच्या लक्ष्यापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला.

इंग्लंड संघाच्या या सामन्यात रेहान अहमदने सहा षटके टाकत ४१ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. रेहान व्यतिरिक्त थॉमस ऍस्पिनवाल यांना दोन आणि जोशुआ बॉयडेन आणि कॅप्टन पर्स्ट यांना अनुक्रमे एक यश मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी यादी जाहीर, ५९० खेळाडूंवर बोली लागणार ; जाणून घ्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -