घरICC WC 2023ICC WC 2023 : IND-AUSमध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी होणार महामुकाबला

ICC WC 2023 : IND-AUSमध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी होणार महामुकाबला

Subscribe

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (ता. 19 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC ODI WORLD CUP 2023) अंतिम सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात आज (ता. 19 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामना जिंकला होता. परंतु यावेळी भारतीय संघाला 20 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ आतापर्यंत सर्व 10 सामने जिंकून अपराजित राहीला असून अंतिम फेरीतही भारतीय संघच विजयी होणार असल्याचा विश्वास सर्वच क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजचा हा सामना अनेक गोष्टींमुळे मबत्त्वाचा ठरणार आहे. (ICC WC 2023 : IND-AUS will be the grand finale of the World Cup)

हेही वाचा – IND vs AUS FINAL : फायनलपूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध; पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत काय घडले?

- Advertisement -

आजच्या सामन्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संबंधित. कारण राहुल द्रविड हे 1999 आणि 2003 या दोन्ही विश्वचषकांमध्ये खेळाडू म्हणून टीम इंडियाचा भाग होता. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये सौरव गांगुली याने भारताचे कर्णधार पद भूषविले होते. परंतु, त्यावेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत पराभूत व्हावे लागले. त्यानंकर 2007 च्या विश्वचषकात प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी राहुल द्रविडला कर्णधार बनवले, परंतु गट फेरीतच पराभूत झाल्याने भारतीय क्रिकेट संघ बाहेर पडला. त्यामुळे आता 20 वर्षांनंतर राहुल द्रविड याला कर्णधार पदाच्या जबाबदारीत नाही परंतु, प्रशिक्षक पदाच्या जबाबदारीत हा विश्वचषक मिळवून द्यायचा आहे. जर भारतीय संघाने विष्वचषक आपल्या नावे केला तर राहुल द्रविड यांनाच संघ प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतील असे बोलले जात आहे.

आजच्या सामन्यातील दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नाणेफेक. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये नाणेफेक ही फार महत्त्वाची ठरते. विशेषतः विष्वचषकांच्या सामन्यांमध्ये नाणेफेक हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो. यंदाच्या विष्वचषकात नाणेफेक आतापर्यंत भारतीय संघाच्या फेव्हरमध्ये राहिली आहे. परंतु आजच्या सामन्यासाठी नाणेफेक निर्णायक ठरणार आहे. नाणेफेकीमुळे दोन्ही कर्णधारांना मोठ्या संकटात येऊ शकतात. मैदानावरील कामगिरी सोबत अनेक संघाचे नशिब टॉसवर देखील ठरते. पहिल्यांदा गोलंदाजी करायची त्यानंतर समोरच्या टीमने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करत विजय मिळवणे सहज शक्य होते.

- Advertisement -

पाकिस्तानच्या संघाविरोधात देखील भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला. परंतु आज ज्या पीचवर मॅच होणार आहे त्या पिचवर अगोदर भारत-पाकिस्तानची मॅच झाली आहे. या पीचवर विकेट मिळवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे दोन्ही कर्णधारांसाठी हे टेन्शन असणार आहे. जर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर नंतर स्कोअर चेस करणे सोपे जाईल. परंतु हा निर्णय कदाचीत अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नंतर संघावर दबाव वाढत जातो. अनेक वेळा तर अशी परिस्थिती असते की टॉसच्या वेळीच नक्की होते की कोणता संघ विजयी होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील नाणेफेकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -