घरICC WC 2023ICC WC 2023 : विराटचा चाहता 'फ्री पॅलेस्टाइन' टी-शर्ट घालून मैदानावर; दहशतवादी...

ICC WC 2023 : विराटचा चाहता ‘फ्री पॅलेस्टाइन’ टी-शर्ट घालून मैदानावर; दहशतवादी पन्नूकडून लाखोंचे बक्षीस

Subscribe

अहमदाबाद : विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असताना एक घटना घडली. विराट कोहलीच्या एका चाहत्याने “फ्री पॅलेस्टाइन” टी-शर्ट घालून स्टेडियमची सुरक्षा भेदत थेट मैदानात प्रवेश केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडतेय हे कुणालाच काही कळत नव्हते. सुरक्षा रक्षकाने त्या फॅन्सला मैदानाबाहेर काढले. मात्र अमेरिकेतील दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आणि कॅनडास्थित खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसने या तरुणांला लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. (ICC WC 2023  Virat Kohli fan wayne johnson wears Free Palestine t shirt on Narendra Modi Stadium field  Lakhs reward from terrorist gunpanvant singh pannu)

हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला?

- Advertisement -

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन तरुणांला 10 हजार डॉलर्स म्हणजेच 8.33 लाख रुपयांचे बक्षीस दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आणि कॅनडास्थित खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसने जाहीर केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जात असताना तरुण “फ्री पॅलेस्टाईन” टी-शर्ट घालून मैदानात उतरला होता. यावेळी त्याने पॅलेस्टाइन ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. वेन जॉन्सन असे ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने तरुणाचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जॉन्सन म्हणाला की, “माझे नाव जॉन आहे. आणि मी ऑस्ट्रेलियाचा आहे. मी विराट कोहलीला भेटायला आलो आहे आणि मी पॅलेस्टाइनला पाठिंबा देतो.” गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याचा बॉम्बफेक थांबवण्याच्या समर्थनार्थ त्याने टी-शर्ट घातल्याचे समोर आले आहे. पांढऱ्या टी-शर्टच्या पाठीवर ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे छापलेले होते. त्याच्या हातात पॅलेस्टाईनचा ध्वजही होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले.

- Advertisement -

हेही वाचा – WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर

इस्रायल-हमास युद्धामुळे जॉन्सन नाराज

आयसीसी कोणत्याही कार्यक्रमात वेन जॉन्सनने केलेल्या प्रकाराला परवानगी देत नाही. भारतही अशा प्रकाराला परवानगी देत ​​नाही. आरोपी जॉन्सन हा चिनी-फिलिपिनो मूळचा ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे तो नाराज आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 13,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी एक चतुर्थांश लहान मुलांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -