मुंबई: भारतानं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत विजयाची दशमी साजरी केली. या एकदिवसीय विश्वचषकात भारताने सगळे साखळी सामने जिंकले आणि काल, ( 15 नोव्हेंबर) झालेल्या सेमी फायनल सामन्यात किंवींना धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली. भारतानं आपला विजयाचा रथ हा कायम ठेवला आहे. भारतीय संघाचा हा सलग 10 वा विजय आहे. याआधी भारताने विश्वचषकात अशी कामगिरी कधीही केलेली नाही. विश्वचषकातील सर्व सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. (CC WC 2023 Will India break Australia s record on Sunday 19 november Will become a world champion)
भारताने आतापर्यंत या विश्वचषकात खेळवण्यात आलेले सर्व सामने जिंकले आहेत. भारताने नऊ साखळी सामने जिंकले तसंच काल, बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय नोंदवत आपलं फायनलचं तिकीट काढलं आहे. म्हणजेच भारतानं आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. सलग सामने जिंकणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाने केला आहे. ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 ला विश्वचषकातील सलग सगळे सामने म्हणजचे 11 च्या 11 सामने जिंकत जगज्जेते पद पटकावलं होतं. आता ऑस्ट्रेलियाच्या याच विक्रमाची भारत बरोबरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नोंदवलेले विजय
वर्ल्ड कपच्या इतिहासात अपराजित राहून वर्ल्डकप जिंकण्याचा विक्रम 1975 आणि 1979 साली वेस्ट इंडिजने केला आहे. तसंच, 2003 आणि 2007 साली ऑस्ट्रेलियाने अपराजित राहत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
भारताने आपली विजय घोडदौड चालूच ठेवली आहे. त्यामुळे भारत अंतिम सामना जिंकला तर एकाच वर्ल्डकपमध्ये सलग 11 विजयांच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी साधली जाईल. 2003 ते 2007 साली ऑस्ट्रेलियाने सर्वच्या सर्व 11 सामने जिंकण्याचा विक्रम करत जगज्जेतेपद पटकावले होते.
वर्ल्डकपमध्ये अपराजित राहून जगज्जेतेपद केवळ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानेच जिंकले आहेत. विंडीजने सलग पाच विजयांसह पहिले दोन वर्ल्ड कप काबीज केले होते. या चार स्पर्धा वगळता एकाही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
याआधी न्यूझीलंडने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये सलग सात साखळी सामने जिकंले होते, मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सलग दोन पराभवांनी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपले होते. 2003 साली भारतही सलग आठ वेळा जिंकला होता आणि अंतिम सामन्यात पोहोचला होता. परंतु अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच, 2015 मध्ये न्यूझीलंड हा एकमेव संघ सलग आठ सामने जिंकत अंतिम सामन्यात हरला होता.
भारतानेही आता सगळे साखळी सामने जिंकले आहेत. तसंच सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. सलग 10 सामने जिंकण्याची कामगिरी भारतानं केली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतला रविवारी, 19 नोव्हेंबरला होणारा सामना जिंकत भारत जगज्जेता होणार का? तसंच ऑस्ट्रेलियाची बरोबरी साधणार का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
(हेही वाचा: IND vs NZ : मोहम्मद शामीने वर्चस्व गाजवले, 7 विकेट घेत न्यूझीलंडची मोडली कंबर; लावली विक्रमांची माळ )