घरक्रीडाWomen ODI Ranking : तीन वर्षांनंतर मिताली राजची पुन्हा अव्वल स्थानी झेप

Women ODI Ranking : तीन वर्षांनंतर मिताली राजची पुन्हा अव्वल स्थानी झेप

Subscribe

फेब्रुवारी २०१८ नंतर अव्वल स्थान पटकावण्याची ही मितालीची पहिलीच वेळ ठरली.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. फेब्रुवारी २०१८ नंतर अव्वल स्थान पटकावण्याची ही मितालीची पहिलीच वेळ ठरली. भारताने नुकतीच झालेली इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका १-२ अशी गमावली. परंतु, मितालीने या तिन्ही सामन्यांत अर्धशतके केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर मितालीने तीन वर्षांनंतर पुन्हा फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. या यादीत दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली तिसऱ्या स्थानावर आहे.

पाच स्थानांची बढती मिळाली

भारतीय महिला संघाने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. या सामन्यांत मितालीने अनुक्रमे ७२ आणि ५९ धावांची खेळी केली होती. तर तिसऱ्या सामन्यात मितालीच्या नाबाद ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने चार विकेट राखून विजय मिळवत एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड केला होता. या सलग तीन अर्धशतकांमुळे मितालीला पाच स्थानांची बढती मिळाली आहे.

- Advertisement -

१६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अव्वल स्थानी 

मितालीने एप्रिल २००५ मध्ये पहिल्यांदा फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यावेळी तिने वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता १६ वर्षांनी ती पुन्हा अव्वल स्थानी पोहोचली आहे. भारताची सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानी कायम आहे. तसेच शेफाली वर्माला ४९ स्थानांची बढती मिळाली असून ती ७१ व्या स्थानी पोहोचली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -