घरक्रीडासेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण

सेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण

Subscribe

भारतीय महिलांनी जोरदार खेळीच्या जोरावर सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील संघ निश्चित झाले आहेत. भारतीय महिलांनी जोरदार खेळीच्या जोरावर सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्यापठोपाठच अ गटातून ऑस्ट्रेलिअन महिलांनी सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. ब गटात इंग्लंड महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांनी स्थान पक्के केले आहे. मात्र तरी सेमीफायनलमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार याचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.

सेमीफायनलमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार

मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात साखळी सामन्यातील अखेरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली तर भारताचा सेमीफायनलमधील सामना हा इंग्लंडच्या महिला संघाशी होईल. जर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ब गटात सध्याच्या दुसऱ्या क्रामांकावर कायम राहिल आणि त्यांना सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाचे आव्हान पेलावे लागेल. विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभूत केले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियन महिलांनी पराभवाचा धक्का दिला होता. मात्र विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला नमवून स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याच्या दिशेने वाटचाल केली होती. भारतीय महिलांनी चारही सामने जिंकत दिमाखात सेमीफायनल गाठली असून कोणत्याही संघाला नमवून संघ यंदा पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असेल.

- Advertisement -

८ मार्चला महिला विश्वचषकातील फायनल लढत

महिला टी-२० विश्वचषकातील सेमीफायनलच्या दोन्ही लढती ५ मार्चला सिडनीच्या मैदानात होणार आहेत. पहिला सेमीफायन सामना भारत विरूद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकावर असणारा संघ यांच्यात खेळवला जाईल. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ब गटात अव्वल स्थानी असलेल्या संघआशी भिडेल. ८ मार्चला महिला विश्वचषकातील फायनल बाजी ही मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -