घरक्रीडाICC Women's worldcup 2022: बांग्लादेशचा पराभव करत इंग्लंडची उपांत्यफेरीत धडक

ICC Women’s worldcup 2022: बांग्लादेशचा पराभव करत इंग्लंडची उपांत्यफेरीत धडक

Subscribe

बांगलादेशचा दणदणीत परभाव करत इंग्लंडने आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात १०० धावांच्या मोठ्या फरकानं बांगलादेशचा पराभव केला.

बांग्लादेशचा दणदणीत परभाव करत इंग्लंडने आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात १०० धावांच्या मोठ्या फरकानं बांग्लादेशचा पराभव केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २३४ धांवांचे लक्ष्य बांग्लादेशसमोर ठेवलं होतं. मात्र बांगलादेशच्या खेळाडूंना हे लक्ष्य पार करता आले नाही.

उपात्यफेरी गाठण्यासाठी इंग्लंडला कोणत्याही परिस्थिती बांगलादेश विरोधात जिंकणे महत्वाचं होतं. त्यामुळं इंग्लंडच्या खेळाडूंनी आपली सर्व ताकद पणाला लावत बांग्लादेशच्या खेळाडूंना १३४ धावांवर गुंडाळले आणि सामना आपल्या नावावर केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. मात्र, इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. २६ धावांवरच इंग्लंडच्या महिला संघाला २ विकेट गमावल्या होत्या.

- Advertisement -

डॅनियल वेट आणि कर्णधार हीदर नाइट प्रत्येकी ६ धावा करून बाद झाल्या. यानंतर टॅमी ब्युमॉन्ट (३३) आणि नॅट स्कायव्हर (४०) यांनी संघाची धुरा सांभाळत ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर ९६ धावांच्या धावसंख्येवर इंग्लंडने आपल्या ४ महत्त्वाच्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. या महिला खेळाडू बाद झाल्यानंतर एमी जोन्स (३१) आणि सोफिया डंकले (६७) यांनी संघाची धुरा सांभाळली आणि ७१ धावांची भागीदारी करून धावसंख्या १६८ पर्यंत नेली.

- Advertisement -

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कॅथरीन ब्रंट नाबाद (२४), सोफी एक्लेस्टन नाबाद (१७) धावा करत बांग्लादेशसमोर २३४ धावांचं लक्ष्य ठेवलं. इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ४२ धावा केल्या, मात्र शर्मीन अख्तर बाद झाल्यानंतर संघाच्या एका मागोमाग एक विकेट पडू लागल्या. यामुळे बांग्लादेशचा संपूर्ण संघ ४८ षटकांत १३४ धावांत गारद झाला.


हेही वाचा – BCCIकडून नीरज चोप्रासह टोकियो ऑलिंपिक पदक विजेत्यांचा सन्मान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -