ICC Women’s T-20 World Cup: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

Smriti Mandhana Indian women cricketer
cricket opener smriti mandhana injured

महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने साखळी सामन्यातील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब गटातून चारही सामने जिंकत भारताने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलदांजानी या निर्णयाला साजेशी खेळी करत २० ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियासमोर १६८ रन्सचे आव्हान ठेवले होते.

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने केवळ ५५ बॉल्समध्ये ९ फोर आणि ३ सीक्सर ठोकत ८३ धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीतनेही ताबडतोब फलदांजी करत २७ बॉल्समध्ये ३ फोर आणि ३ सीक्सर मारत ४३ रन्स ठोकले. ऑस्ट्रेलियन संघाची धावांचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने १९.४ षटकात ९ बाद ११९ धावा केल्या.

भारताची सलामीची सुरुवात थोडीशी अडखळत झाली तानिया भाटिया अवघ्या दोन रन्सवर आऊट झाल्यानंतर स्म्रिती मनधानाने भारतीय फलदांजीची कमान सांभाळली. मात्र दुसऱ्या बाजुने एकही फलंदाज टीकू शकला नाही हरमनप्रीतचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दहा रन्सचा टप्पा पार करता आला नाही. तरिही स्म्रीती आणि हरमनप्रीतच्या जोरावर भारताने १६८ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.