घरICC WC 2023ODI WordCup Final 2011 : माजी कर्णधार धोनीला दिलेल्या ट्रॉफीचा वाद पुन्हा...

ODI WordCup Final 2011 : माजी कर्णधार धोनीला दिलेल्या ट्रॉफीचा वाद पुन्हा चर्चेत; वाचा नेमकं प्रकरण काय?

Subscribe

वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारतीय संघ चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारतीय संघ चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. सध्या देशभरात क्रिकेटचा फिव्हर पाहायला मिळत आहे. पण या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर वनडे वर्ल्डकपच्या ट्रॉफीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा वाद म्हणजे वर्ल्डकप विजेत्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. (icc world cup 2011 trophy controversy winning team gets replica trophy)

नेमकं प्रकरण काय?

भारतीय संघाने 2011 मध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंके संघा विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत वाद निर्माण झाला होता. तो वाद इतका चिघळला की आयसीसीला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. हा वाद म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार धोनीला जेतेपद पटकावल्यानंतर देण्यात आलेल्या वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत होता. धोनीला दिलेली ट्रॉफी खरी ट्रॉफी नसून खोटी ट्रॉफी असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले.

- Advertisement -

LIVE IND vs AUS WC Final : भारताने 3 विकेट गमावल्या, विराट – केएल राहुल क्रिजवर

त्यावेळी ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूळ ट्रॉफी मुंबईच्या कस्टम विभागाकडे आहे आणि पेमेंटच्या समस्येमुळे ती ट्रॉफी दिली गेली नाही. ही बातमी मीडियात येताच चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटू चांगलेच संतापले. मात्र त्यानंतर ICCने याबाबत एक निवेदन जारी केले. या निवेदनात त्या ट्रॉफीबाबत स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

या निवेदनात आयसीसीने मीडिया रिपोर्ट्सला चुकीचे ठरवले होते आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दिलेली ट्रॉफी ही या स्पर्धेची ओरिजनल ट्रॉफी असल्याचे म्हटले होते. आयसीसीने सांगितले होते की, दिलेली ट्रॉफी तीच आहे जी क्रिकेट वर्ल्ड कप-2011 साठी बनवली होती आणि त्यावर कार्यक्रमाचा लोगो देखील आहे.


हेही वाचा – IND vs AUS Final : अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या वसीम अक्रमचे भारतीय खेळपट्टीवर विधान; म्हणाला…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -