घरICC WC 2023ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं..."; विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी राज...

ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं…”; विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

Subscribe

ठाणे : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत (ICC World Cup 2023) भारतीय संघाने (India) न्यूझीलंडचा (New zealand) पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stedium) पार पडलेल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर  (Shreyas Iyer) यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) 7 विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यानंतर आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) संघ आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांमधील विजयी संघ रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताशी दोन हात करणार आहे. पण त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल वक्तव्य केलं आहे, जे सध्या चर्चेत आहे. (ICC World Cup 2023 Sahabne Bola Hain Raj Thackerays statement ahead of World Cup final in discussion)

हेही वाचा – IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप

- Advertisement -

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आज (16 नोव्हेंबर) ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षांवर आक्षेप घेतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं गंमतीत उदाहरण दिले.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी (दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया) जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. पण मला बहुदा वाटतं की, त्यांच्यापैकी जो संघ जिंकेल त्यांना सांगितली जाईल की, साहबने बोला हैं हारने को (साहेबांनी पराभूत होण्यास सांगितलं आहे).

लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धा विसरतील

याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, भारताने यंदाचा विश्वचषक जिंकणं हा आगामी निवडणूक जिंकण्याच्या रणनीतिचा भाग असू शकतो का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, “नाही, लोकसभेच्या निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. जनता चांद्रयानच्या बातम्या विसरली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धाही विसरतील. रोज आपण इतक्या बातम्या आपण पाहतो, आपल्या मोबाईलवर इतक्या बातम्या दिसतात की लोकांना हे सगळं लक्षात ठेवायला वेळ नाही.

हेही वाचा – ICC WC 2023 : पाकिस्तान काही सुधारेना! भारतीय संघावर पुन्हा गंभीर आरोप, केला विचित्र दावा

भाजपाने ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्’स नावाचं खातं उघडलं

दरम्यान, तुम्ही 3 डिसेंबरला भाजपाचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवू. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील सभेत म्हटले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मला वाटतं भाजपाने ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्’स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली? ते लोकांना सांगा. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवता? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात, काय कामं केली ते सांगा, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -