मुंबई : भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात सचिनचा सन्मान करणार आहे. सचिनने त्याच्या शानदार कारकिर्दीत 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 48.52 च्या सरासरीने 34,357 धावा केल्या आहेत. सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. शतकांचे शतक करण्याचा विक्रमही त्याचाच नावावर असू तो एकमेक खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटव्यतिरिक्त, सचिनने वनडे क्रिकेटमध्येही अनेक विक्रम केले आहेत. त्याने वनडे सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने 49 शतके आणि 96 अर्धशतकांसह 18,426 धावा केल्या आहेत. तसेच, कसोटी सामन्यांमध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतकांसह 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. त्याने त्याच्या शानदार कारकिर्दीत फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने भारतासाठी 664 सामने खेळले आणि 48.52 च्या सरासरीने 34,357 धावा केल्या. यामध्ये 100 शतके आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सचिन तेंडूलकर याचा 2024 सालासाठी सीके नायडू ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर हा 31 वा खेळाडू आहे. भारताचे पहिले कर्णधार कर्नल सीके नायडू यांच्या सन्मानार्थ 1994 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला. नायडू यांनी प्रशासक म्हणूनही क्रीडा क्षेत्रात काम केले. नायडू यांची 1916 ते 1963 अशी 47 वर्षांची प्रथम श्रेणी कारकीर्द होती, जी एक जागतिक विक्रम आहे.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी दिग्गज यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या काळातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा तेंडुलकर केवळ एक उत्तम धावा करणारा खेळाडू नव्हते तर खेळाचा एक आदर्श देखील होता. त्याने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तो दोन दशके संघाची सेवा करत राहिला. विशेष म्हणजे 2011 मध्ये भारताच्या विश्वविजेत्या संघाचाही भाग होता. हा त्याचा सहावा आणि शेवटचा वनडे विश्वचषक होता.
जगभरातील गोलंदाज सचिनच्या फलंदाजीला कठीण समजायचे. दिवंगत शेन वॉर्नपासून ते मुथय्या मुरलीधरनपर्यंत सर्वांनी सचिनचे कौतुक केले आहे. तो कधीही सामन्याचा मार्ग बदलू शकतो असे म्हटले आहे. अनेक गोलंदाजांचा असा विश्वास आहे की, सचिनला गोलंदाजी करणे हे सर्वात कठीण काम होते. विरोधी संघ त्याच्यासाठी खास योजना आखत असत. जगभरातील अनेक माजी महान गोलंदाजांनी म्हटले आहे की, भारतीय फलंदाजांमध्ये त्यांना फक्त तेंडुलकरशीच समस्या होती.
हेही वाचा – Virat Kohli : 12 वर्षांनी आला अन् 6 वर बाद झाला, पहिल्या रणजी सामन्यात कोहलीची कामगिरी