घरक्रीडाआय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप स्पर्धा

आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप स्पर्धा

Subscribe

पुण्याचा वेरॉक वेंगसरकर अकादमीचा संघ माहुल येथे झालेल्या आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स कप या १२ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मानकरी ठरला. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स अकादमीवर ७ विकेट राखून विजय मिळवला.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स अकादमी संघाला निर्धारित २० षटकांत ८ विकेट गमावत केवळ ७८ धावांची मजल मारता आली. वेरॉकच्या मल्हार अदक (३ विकेट) आणि डावखुरा फिरकीपटू ओम पवार (२ विकेट) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करणार्या वेरॉक वेंगसरकर अकादमीला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले.

- Advertisement -

मात्र, १९व्या षटकात त्यांनी ७९ धावांचे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला. त्यांच्या शुभ श्रीवास्तव (नाबाद ४४) आणि अदविक तिवारी (२०) यांनी चांगली फलंदाजी केली. आय.डी.बी.आय. अकादमीचा ऑफ स्पिनर आर्यन कुमारने चांगली गोलंदाजी करत ८ धावांत ३ विकेट घेतल्या.

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शुभ श्रीवास्तव याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आर्यन कुमारला (६१ धावा आणि ७ बळी) मिळाला. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून लक्ष्य शिंदे (आय.डी.बी.आय.), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अरमान बोरकर (वेरॉक) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून चिराग मोडक (आय.डी.बी.आय.) यांना गौरविण्यात आले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स अकादमी : २० षटकांत ८ बाद ७८ (चिराग मोडक १७; मल्हार अदक ३/१३) पराभूत वि. वेरॉक वेंगसरकर अकादमी (पुणे) : १८.१ षटकांत ३ बाद ८० (शुभ श्रीवास्तव ४४, अदविक तिवारी २०; आर्यन कुमार ३/८).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -