घरक्रीडाIPL 2022: पाऊस पडल्यास फायनलमध्ये 'हे' संघ खेळणार, जाणून घ्या बीसीसीआयचा नवा...

IPL 2022: पाऊस पडल्यास फायनलमध्ये ‘हे’ संघ खेळणार, जाणून घ्या बीसीसीआयचा नवा नियम

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग (Indian Primier League) स्पर्धेचे सर्व लीग सामने संपले असून आता प्ले ऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) दाखल झालेल्या चार संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे. या चार संघांपैकी पहिल्या दोन संघांत क्लालिफायर (Qualifire 1) आणि दुसऱ्या दोन संघांत एलिमिनेटरचा (eliminator) सामना होणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीग (Indian Premier League) स्पर्धेचे सर्व लीग सामने संपले असून आता प्ले ऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) दाखल झालेल्या चार संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे. या चार संघांपैकी पहिल्या दोन संघांत क्लालिफायर (Qualifier 1) आणि दुसऱ्या दोन संघांत एलिमिनेटरचा (eliminator) सामना होणार आहे. मात्र, सध्या देशाच्या काही भागात ढगाळ वातावरणासह पाऊस (rainfall) पडतोय. त्यामुळे पाऊस कायम राहिला तर, हे दोन सामने खेळवले जाणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रश्नावर आता बीबीसीआयने (BCCI) नव्या नियमांनुसार उत्तर दिले आहे.

आयपीएलच्या प्ले ऑफला आता उद्यापासून सुरुवात होणार आहे. प्ले ऑफमधील पहिला क्लालिफायर सामना गुजरात टायट्न्स (Gujarat Titan) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. तसेच, दुसरा एलिमिनेटरचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) यांच्यात होणार आहे. मात्र आज कोलकातामध्ये (Kolkata) पावसामुळे मैदानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाऊस कायम राहिल्यास बीसीसीआयच्या नवा नियमानुसार, पावसामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये 20-20 षटकांचा सामना खेळवणे शक्य नसल्यास दोन्ही संघांना 5-5 षटकांचे सामने खेळण्याची संधी दिली जाईल. या 5-5 षटकांच्या सामन्यांमध्ये स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नसेल. या 5-5 षटकांच्या सामन्यांमध्ये विजेता ठरवण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : मुंबईने चार वर्षांनी घेतला दिल्लीचा बदला

मात्र पावसामुळे हे 5-5 षटके टाकणेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या एका षटकामध्ये जो संघ बाजी मारेल, तो विजयी ठरणार आहे. पण जर सुपर ओव्हर (Super Over) खेळवणेही शक्य न झाल्यास गुणतालिकेचा आधार घेण्यात येईल. पहिला सामना हा गुजरात आणि राजस्थानमध्ये होणार आहे. या सामन्यात एकही षटक होऊ शकले नाही तर गुजरात गुणतालिकेत (Ipl Point table) अव्वल स्थानावर असल्यामुळे त्यांना विजेता ठरवले जाईल आणि गुजरातचा संघ फायनलमध्ये (IPL Final) दाखल होईल.

- Advertisement -

हेही वाचा – युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज; फिरकीपटू हरभजनचा मोडला विक्रम

एलिमिनेटर हा सामना आरसीबी आणि लखनऊ यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यातही एका षटकाचा खेळ झाला नाही तर गुणतालिका पाहिली जाईल आणि त्यानुसार लखनऊच्या संघाला विजयी ठरवले जाईल. त्यातच महत्वाचे म्हणजे या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. बीसीसीआयने फक्त अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे आता प्ले ऑफमधील सामने होणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – IPL 2022 : आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदाच लगावले 1 हजार षटकार, 4 वर्ष जुना विक्रम मोडीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -