घरक्रीडाIND vs AUS : तर रोहित शर्माला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवा - सचिन...

IND vs AUS : तर रोहित शर्माला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवा – सचिन तेंडुलकर

Subscribe

रोहितची ११ डिसेंबरला फिटनेस चाचणी होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. मात्र, त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळले नव्हते. यंदाच्या मालिकेत मात्र हे दोघेही खेळणार असल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे. त्यातच भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या मालिकेत खेळण्याबाबत साशंकता आहे. रोहितला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळला नाही. मात्र, रोहितची ११ डिसेंबरला फिटनेस चाचणी होणार असून या चाचणीत पास झाल्यास रोहितला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवले पाहिजे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला एका अनुभवी खेळाडूची गरज भासणार आहे. विराटची उणीव भारताला नक्कीच भासेल. परंतु, भारतीय संघ एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. मला अजूनही आठवते की, वेस्ट इंडिजमध्ये आम्हाला अनिल कुंबळेविना कसोटीत खेळावे लागले होते. त्यावेळी अनिल आमचा सर्वोत्तम गोलंदाज होता. त्यामुळे प्रत्येक संघाला काही आव्हानांना सामोरे जावे लागते. भारतीय संघाची राखीव फळी मजबूत आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत आणखी एखाद्या खेळाडूला संधी मिळेल. तसेच रोहितच्या फिटनेसबाबत मला पूर्ण माहिती नाही. मात्र, रोहित जर फिटनेस चाचणीत पास झाला, तर त्याला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवले पाहिजे. रोहितसारखा खेळाडू ऑस्ट्रेलियात खेळला पाहिजे, असे तेंडुलकरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -