Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ...तरच तुम्हाला पाकिस्तान संघातून खेळण्याची संधी मिळते; क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट 

…तरच तुम्हाला पाकिस्तान संघातून खेळण्याची संधी मिळते; क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट 

बरेचदा खेळाडूंवर अन्याय होतो. त्यांना संघातून आत-बाहेर केले जाते.

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानचा संघ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक मानला जातो. या संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. मात्र, त्याचवेळी कोणताही संघ पाकिस्तानचा पराभवही करू शकतो. पाकिस्तानने सर्वोत्तम खेळाडूंनाच संघात स्थान दिले, तर हा संघ सातत्याने यशस्वी ठरू शकतो. परंतु, बरेचदा खेळाडूंवर अन्याय होतो. त्यांना संघातून आत-बाहेर केले जाते. त्यामुळे या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कमी असतो, असे पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज जुनेद खान म्हणाला. तसेच खेळाडू जर कर्णधार किंवा प्रशिक्षकांच्या जवळचा असाल, तरच त्याला पाकिस्तानकडून सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळते, असा गौप्यस्फोटही जुनेदने केला.

अन्यथा सतत संघातून आत-बाहेर

जुनेद हा पाकिस्तानचा सर्वात प्रतिभावान वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने २२ कसोटी, ७६ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, मे २०१९ पासून तो पाकिस्तान संघाच्या बाहेर आहे. याबाबत तो म्हणाला, तुमचे जर कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी चांगले संबंध असतील, तुम्ही त्यांच्या जवळ असाल, तरच तुम्हाला सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळते. अन्यथा तुम्ही सतत संघातून आत-बाहेर होत राहता.

संघ व्यस्थापनासोबतचे संबंध बिघडले

- Advertisement -

तसेच सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही मला संघातून वगळण्यात आल्याचेही जुनेद म्हणाला. मी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत पाकिस्तानकडून खेळत होतो. मला विश्रांती हवी असायची, तेव्हासुद्धा मला सामने खेळायला लावायचे. त्यामुळे माझे संघ व्यस्थापनासोबतचे संबंध थोडे बिघडले. त्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. मी चांगली कामगिरी केल्यानंतरही मला सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, असे जुनेदने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -