घरक्रीडामहिला क्रिकेटमध्ये आयएमए नाशिक रेनबो विजेता

महिला क्रिकेटमध्ये आयएमए नाशिक रेनबो विजेता

Subscribe

आयएमए राष्ट्रीय क्रीडा महोत्सवास नाशकात प्रारंभ; ३१ पर्यंत विविध स्पर्धांची मेजवानी

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय क्रीडा ऑलिम्पिक स्पर्धा यंदा नाशिक येथे होत असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बुधवारी (दि. २७) गोल्फ क्लब मैदानावर झाले. याप्रसंगी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार प्रमुख पाहुण्या होत्या. पहिल्या दिवशी महिला क्रिकेट सामने पार पडले. आयएमए नाशिकच्या रेनबो टीमने यात विजेतेपद पटकावले. गायनॅक गॅलेक्सी संघ उपविजेता ठरला.

महिला डाक्टरांनी लक्षणीय सहभाग नोंदवत स्पर्धेची शोभा वाढवली. डॉ. मुकेश खैरनार, डॉ. सुहास कोटक, डॉ. अमोल राजदेव यांनी या स्पर्धांसाठी परिश्रम घेतले. आयएमएच्या नाशिक शाखेने दुसर्‍यांदा या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस आणि सचिव डॉ. कविता गाडेकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना नाशिक आयएमएच्या विविध कार्यांचा उल्लेख केला. उपक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विशाल गुंजाळ आणि डॉ. भूषण नेमाडे परिश्रम घेत असल्याने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. आयएमए नाशिकचे डॉ. शिरीष देशपांडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. मिलिंद गांगुर्डे, डॉ. नितीन चितळकर आदींसह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे समीर रकटेदेखील याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisement -

यावर्षी क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, मॅरेथान, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन अशा विविध खेळांचा समावेश यंदाच्या या उत्सवात केला असल्याचे क्रीडा समन्वयक डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी सांगितले. स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून डॉक्टर्स सहभागी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांनी आभार मानले

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -