घरक्रीडाधोनीला खरंच फलंदाजी येते का, असा प्रश्न पडलेला! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाने सांगितला...

धोनीला खरंच फलंदाजी येते का, असा प्रश्न पडलेला! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाने सांगितला किस्सा

Subscribe

धोनीने काही चेंडू पायाची हालचाल न करताच मारले. त्यामुळे तो नक्की कोण आहे, हे मला कळले नाही.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक मानला जातो. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मात्र, त्याआधी त्याने भारताकडून खेळताना क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून १५ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. परंतु, असे असतानाही दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्खियाला फलंदाज म्हणून धोनीच्या क्षमतेवर शंका होती. २०१० मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली. त्यावेळी वयाच्या १६ व्या वर्षी नॉर्खियाला चेन्नई सुपर किंग्स संघाने नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले होते आणि तिथे त्याला धोनीविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. परंतु, धोनी नेट्समध्ये खेळताना पायांचा फारसा वापर करत नसल्याने त्याला खरेच फलंदाजी येते का? असा नॉर्खियाला प्रश्न पडला होता.

गोलंदाजीला फारसा वेग नव्हता

२०१० मध्ये मला चेन्नई सुपर किंग्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. मी त्यावेळी फार मोठा नव्हतो. त्यामुळे गोलंदाज म्हणून मला कोणीही घाबरत नव्हते. मी त्या काळात वयोगटांतील (एज ग्रुप) क्रिकेट खेळत होतो. माझ्या गोलंदाजीला फारसा वेगही नव्हता. त्यावेळी मी धोनीला गोलंदाजी केल्याचे मला अजूनही आठवते. अगदी खरे सांगायचे, तर त्याला फलंदाजी करता येते असे मला अजिबातच वाटले नाही, असेनॉर्खिया म्हणाला.

- Advertisement -

गोलंदाजी करून मजा आली

धोनीने काही चेंडू पायाची हालचाल न करताच मारले. त्यामुळे तो नक्की कोण आहे, हे मला कळले नाही. मी खोटे सांगणार नाही, धोनीला खरेच फलंदाजी करता येते का? असा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. परंतु, त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करून मला मजा आली, असे २७ वर्षीय नॉर्खियाने एका मुलाखतीत सांगितले. नॉर्खिया आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत असून या स्पर्धेत त्याला धोनीविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने मागील वर्षी धोनीला बादही केले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -