घरक्रीडाऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे निवृत्तीचे संकेत; म्हणाला, 'हे वर्ष...'

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे निवृत्तीचे संकेत; म्हणाला, ‘हे वर्ष…’

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहे. 2023 वर्ष हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील अंतिम वर्ष ठरू शकते, असे त्याने सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहे. 2023 वर्ष हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील अंतिम वर्ष ठरू शकते, असे त्याने सांगितले. परंतु, वॉर्नरच्या निवृत्तीचे संकेत समजताच क्रिकेटप्रेमीमध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. (in international cricket david warner hints retirement 2023 likely to be his last year)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डेव्हिड वॉर्नरने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. “2023 वर्ष माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील अंतिम वर्ष ठरू शकते. मात्र माझे लक्ष्य 2024(T20)विश्वचषक आहे. त्यामुळे माझे करिअर अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदाने संपवणे चांगले राहील”, असे वॉर्नरने सांगितले.

- Advertisement -

2024मध्ये वेस्टइंडीज आणि यूएसए यांच्या यजमानपदी होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळण्याबाबत डेव्हिड वॉर्नरने इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या स्पर्धेसाठी निवड होणे बाकी आहे. दरम्यान, 2009 पासून वॉर्नर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक राहिला आहे.

डेव्हिड वॉर्नरची कारकिर्द

- Advertisement -

वॉर्नरने आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळताना 46.20 च्या सरासरीने 8,132 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 25 शकते आणि 34 अर्धशकते आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 335 आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघाकडून 141 एकदिवसीय सामने खेळले असून 45.16 च्या सरासरीने 6 हजार 7 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये वॉर्नरने 19 शतके व 27 अर्धशकते झळकावली आहेत.

वॉर्नर टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये वॉर्नरने 99 सामने खेळताना 2894 धावा केल्या आहेत. तसेच, एक शतकही झळकावले आहे. या प्रकारात वॉर्नरने 24 वेळा 50 व त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक व 2021 मध्ये टी-20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा वॉर्नर सदस्य राहिला आहे.


हेही वाचा – न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -