Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup 2021 : विराट कोहलीला मोठा धक्का, ICC T20 च्या...

T20 world cup 2021 : विराट कोहलीला मोठा धक्का, ICC T20 च्या क्रमवारीत घसरण

Subscribe

आयसीसी टी २० क्रमवारीतून विराट कोहलीची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे

टी २० विश्वचषकात रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे पण त्या सामन्याआधीच भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला, भारताकडून कर्णधार कोहलीला वगळता कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या करण्यात यश आले नाही. कोहलीने पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात अर्धशतक झळकावून एकहाती संघर्ष केला होता. पण तरीही आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीला झटका बसला आहे. चांगली फलंदाजी केल्यावर फलंदाजाला बढती मिळायला हवी, पण असे न होता अर्धशतक झळकावूनही कोहलीची आयसीसी क्रमवारीतून घसरण झाली आहे.

कारण पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यापूर्वी कोहली टी २० आयसीसीच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर होता. तर पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यातील अर्धशतकीय खेळीच्या नंतर देखील कोहलीचे स्थान चौथ्या क्रमांकावरून घसरूण पाचव्या क्रमांकावर आले आहे. कोहलीचे चौथे स्थान भारताविरूध्द आक्रमक खेळी केलेल्या मोहम्मद रिझवानने घेतले आहे. रिझवानने क्रमवारीत ७ व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरूध्द आक्रमक सुरूवात केली होती, तो या क्रमवारीत सुरूवातीपासूनच दुसऱ्या स्थानावर होता आणि त्याने भारताविरूध्दच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी खेळून आपले स्थान कायम राखले आहे.

- Advertisement -

या क्रमवारीत इग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान पहिल्या स्थानावर आहे. भारताचा सलामीवीर के.एल.राहुल पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यापूर्वी या क्रमवारीत सहाव्या स्थानावर होता, त्या सामन्यात राहुलला फक्त तीनच धावा करता आल्या, त्यामुळे क्रमवारीत त्याची घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. राहुलची आता सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे भारताच्या दोन्ही फलंदाजांना आयसीसी टी २० क्रमवारीतील आपले स्थान गमवावे लागले आहे.


हेही वाचा – T20 World Cup 2021: Ind vs Pak सामन्यानंतर मोहम्मद शमी ट्रोल, सेहवाग म्हणाला…

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -