घरIPL 2020KXIP vs SRH : हैदराबाद All Out; पंजाबचा दमदार विजय

KXIP vs SRH : हैदराबाद All Out; पंजाबचा दमदार विजय

Subscribe

आयपीएलच्या आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने पुन्हा विजय खेचून आणला आहे. सनरायझर हैदराबादचा डाव ११४ धावांवर आपोटला असून त्यांचे सर्व गडी बाद झाल्याने पंजाबचा सामन्यात विजय झाला आहे. पंजाबने हैरदाबादला १२६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादचा डाव १९.५ चेंडून ११४ धावांवरच संपुष्टात आला.

- Advertisement -

त्याआधी सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल (२७) आणि मनदीप सिंग (१७) यांनी डावाची सावध सुरुवात केली. मनदीपला बाद करत संदीप शर्माने पंजाबला पहिला झटका दिला. क्रिस गेललाही वेगाने धावा करता आल्या नाहीत. २० चेंडूत २० धावा केल्यावर त्याला जेसन होल्डरने माघारी पाठवले. गेल आणि राहुल बाद झाल्यामुळे पंजाबची ३ बाद ६६ अशी अवस्था झाली होती. यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरनने चांगली फलंदाजी करत २८ चेंडूत नाबाद ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने ७ बाद १२६ अशी धावसंख्या उभारली. हैदराबादच्या संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांनी २-२ विकेट घेतल्या.

हेही वाचा –

विराट कोहलीच्या विश्वविजेत्या संघातील ‘हा’ खेळाडू निवृत्त!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -