घरक्रीडाचेल्सी, आर्सनल सेमी-फायनलमध्ये

चेल्सी, आर्सनल सेमी-फायनलमध्ये

Subscribe

युएफा युरोपा लीग

इंग्लिश संघ चेल्सी आणि आर्सनलने युएफा युरोपा लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चेल्सीने स्लाव्हिया प्रागविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील दुसर्‍या लेग ४-३ असा जिंकला. त्यांनी या लढतीचा पहिला लेग १-० असा जिंकला होता. आर्सनलने इटालियन संघ नेपोलीला दोन लेगमध्ये मिळून ३-० अशा गोलफरकाने पराभूत केले. आर्सनलने नेपोलीच्या मैदानावर झालेला दुसरा लेग २-० असा जिंकला. उपांत्य फेरीत चेल्सीचा आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्टशी तर आर्सनलचा स्पॅनिश संघ वेलंसियाशी सामना होईल.

स्लाव्हिया प्रागविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीचा पहिला लेग १-० असा जिंकल्यानंतर चेल्सीने दुसर्‍या लेगची दमदार सुरुवात केली. त्यांना अवघ्या १७ मिनिटांतच ३-० अशी आघाडी मिळाली होती. या सामन्याच्या ५ व्या मिनिटाला पेड्रोने केलेल्या गोलमुळे, तर ९व्या मिनिटाला सिमोन डेलीच्या स्वयं गोलमुळे चेल्सीला २-० अशी आघाडी मिळाली. १७ व्या मिनिटाला पेड्रोच्या पासवर ऑलिव्हिएर जिरुडने चेल्सीचा तिसरा गोल केला. मात्र, यानंतर स्लाव्हियाने चांगले पुनरागमन केले. २५ व्या मिनिटाला स्लाव्हियाच्या टोमास सुचेकने गोल करत चेल्सीची आघाडी १-३ अशी कमी केली, पण पेड्रोने पुन्हा २७ व्या मिनिटाला गोल करत चेल्सीला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम राखली. मध्यंतरानंतर ५१ आणि ५४ व्या मिनिटाला स्लाव्हियाच्या पीटर सेवचेकने २ गोल करत चेल्सीची आघाडी ३-४ अशी कमी केली. मात्र, यानंतर चेल्सीच्या बचावफळीने आपल्या खेळात सुधारणा केल्याने स्लाव्हियाला गोल करता आले नाहीत. चेल्सीने हा सामना ४-३ असा तर दोन लेगमध्ये ही लढत ५-३ अशी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

दुसरा इंग्लिश संघ आर्सनलने उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये नेपोलीचा १-० असा पराभव केला. आर्सनलकडून या सामन्यातील एकमेव गोल अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेटने केला. आर्सनलने त्यांच्या मैदानावर झालेला पहिला लेग २-० असा जिंकला होता. उपांत्यपूर्व फेरीच्या इतर दोन लढतीत आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्टने बेनफिकावर तर वेलंसिया विलेरियालवर मात केली.

उपांत्य फेरीतील लढती

चेल्सी विरुद्ध आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्ट
आर्सनल विरुद्ध वेलंसिया

- Advertisement -

दोन्ही लढतींचा पहिला लेग ३ मे आणि दुसरा लेग १० मे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -