घरक्रीडापैलवान रवी दहियाचे क्रिडा मंत्र्यांना पत्र; अर्जुन पुरस्कार देण्याची केली मागणी

पैलवान रवी दहियाचे क्रिडा मंत्र्यांना पत्र; अर्जुन पुरस्कार देण्याची केली मागणी

Subscribe

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या रवी दहियाने आपल्याला अर्जुन पुरस्कार देण्याची मागणी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या रवी दहियाने आपल्याला अर्जुन पुरस्कार देण्याची मागणी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ज्या पुरस्कारावर माझा हक्क आहे तो मला देण्यात यावा असा उल्लेख पत्रात केला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराच्या जागी मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार देण्याची मागणी जोर धरत आहे. रौप्य पदक विजेत्या रवी दहियाने क्रिडामंत्र्यांना आक्रमक भाषेत पत्र लिहून अर्जुन पुरस्कार देण्याची मागणी केली. दहियाने पत्रात असे देखील नमूद केले आहे की, मी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून अर्जुन पुरस्कारास मुकलो आहे. त्यामुळे माझा ज्या पुरस्कारावर हक्क आहे तो मला देण्यात यावा अशा शब्दांत दहियाने क्रिडा मंत्र्यांना पत्र लिहले.

दहियाने ३१ सप्टेंबरलाच अर्जुन पुरस्कार देण्याची मागणी केली होती

लक्षणीय बाब म्हणजे रवी दहियाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळायच्या अगोदरच अर्जुन पुरस्कारासाठी मागणी केली होती. ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकल्यानंतर त्याने १३ सप्टेंबरला क्रिडा मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली होती की मला खेलरत्न पुरस्कार दिला जावा. पण या मागणीकडे क्रिडा विभागाने दुर्लक्ष केल्याने त्याने याबाबत नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पत्रव्यवहार केला आहे.

- Advertisement -

साक्षी मीरा सुध्दा मैदानात

रवी दहियाशिवाय टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेता सुमित अंतिल आणि नेमबाज अवनी लेखरा यांनी खेलरत्नच्या ऐवजी अर्जुन पुरस्काराची इच्छा व्यक्त केली होती. गेल्यावर्षीच्या ऑलिम्पिक विजेत्या साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना खेलरत्न भेटल्यानंतर देखील अर्जुन पुरस्काराची मागणी केली होती. त्यावर क्रिडा कमेटी तर्फे त्यांच्या या प्रस्तावाला प्रश्व विचारून त्यांना समज दिली होती.
“जेव्हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्यापेक्षा कमी दर्जाचा पुरस्कार कसा काय दिला जाऊ शकतो अशा शब्दांत क्रिडा कमेटीकडून सांगण्यात आले.


हे ही वाचा:T20 world cup 2021: रोहितच्या बदललेल्या बॅटिंग ऑर्डरमुळे गावस्कर भडकले

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -