घरक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत वाढ, गिरीश महाजनांची घोषणा

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत वाढ, गिरीश महाजनांची घोषणा

Subscribe

राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे आणि युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे, यासाठी राज्य सरकारने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे आणि युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे, यासाठी राज्य सरकारने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली. (Increase in prize money for Commonwealth Games medallists Girish Mahajan announces)

देशातील पंजाब, हरियाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती आता जवळपास पाचपट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी साडेसात लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये ऐवजी २० लाख रुपये करण्यात आले आहेत, असे महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

त्याशिवाय, खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी साडेबारा लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना साडेसात लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना पाच लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे, असे महाजन म्हणाले.

राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील 7 खेळाडूंना 8 पदके

- Advertisement -

बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राज्यातील एकूण 14 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 7 खेळाडूंनी 8 पदके प्राप्त केली आहेत. या खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना साडेतीन कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

यामध्ये सुनिल शेट्टी याने टेबल टेनिस (पुरुष सांघिक) या खेळामध्ये सुवर्णपदक, चिराग शेट्टीने बॅडमिंटन (पुरुष दुहेरी) या खेळामध्ये सुवर्णपदक आणि मिक्स सांघिक या खेळामध्ये रौप्यपदक, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव यांनी क्रिकेट (महिला संघ) या खेळामध्ये रौप्यपदक, संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंग (पुरुष 55 कि.ग्रॅ.) या खेळामध्ये रौप्यपदक, अविनाश साबळे ॲथलेटिक्स (3 हजार मिटर स्टिपलचेस) या खेळामध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.


हेही वाचा – फरार You Tuber बॉबी कटारियाची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -