घरक्रीडाT20 2021 : Ind vs AFG विजयामुळे भारताचा रनरेट बदलला, सेमी फायनलचे...

T20 2021 : Ind vs AFG विजयामुळे भारताचा रनरेट बदलला, सेमी फायनलचे नवे समीकरण काय ?

Subscribe

भारतीय क्रिकेट टीमने आयसीसी विश्वचषकामध्ये पहिला विजय मिळवला आहे. बुधवारी अफगाणिस्तानविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला. अवघ्या २ विकेट्सवर भारताने २१० धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात अफगाणिस्तानची टीम मात्र १४४ धावा करू शकली. अफगाणिस्तानने ही धावसंख्या उभारताना ७ विकेट्स गमावल्या. भारताने मोठ्या फरकाने हा सामना जिंकत सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या फॅन्सच्या आशा कायम ठेवली आहे. भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी या सामन्यात जिंकणे गरजेचे होते. अखेर या विजयाने सेमी फायनलचे समीकरण आता बदलले आहे.

भारताच्या टी २० विश्वचषकामध्ये पहिल्याच सामन्यात स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे भारताच्या सेमीफायनल गाठण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला होता. त्यापाठोपाठ भारताने न्यूझीलंडविरोधातील सामनाही गमावला. भारताला या सामन्यात ९९ धावांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवणे गरजेचा होता. पण अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मात्र १४४ धावांपर्यंत मजल मारली. रवीचंद्रन अश्विनच्या कमबॅकमुळे भारतीय संघात एक चांगली गोलंदाजी पहायला मिळाली. या सामन्यामध्ये रवीचंद्रन अश्विनने ४ षटकांमध्ये २ विकेट्स घेत अवघ्या १४ धाव्या दिल्या. त्याचा परिणाम म्हणजे भारताला सामन्यात पकड मिळवतानाच अफगाणिस्तानच्या फलंदाजांवरही दबाव निर्माण करता आला. अश्विनचा कमबॅक ही सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट भारतीय संघासाठी असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर दिली आहे.

- Advertisement -

भारताच्या सेमी फायनलच्या आशा वाढल्या

भारताचा सेमी फायनलचा प्रवास हा न्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर संपुष्टात आला की काय ? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अफगाणिस्तानविरोधात ज्या मोठ्या विजयाची अपेक्षा भारत करत होता, तो मिळवणे भारताला शक्य झाले नाही. ९९ धावांच्या फरकाने अफगाणिस्तान विरोधातील विजय मिळवणे गरजेचे होते. पण भारताला ६६ धावांच्या फरकाने विजय मिळवता आला. सध्या रन रेटच्या बाबतीत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानची टीम भारतापेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे. भारताच्या पहिल्या विजयानंतर फक्त रनरेट हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला इतकाच काय तो फरक कालच्या सामन्यानंतर दिसला आहे.

यापुढचा प्रवास कसा असणार ?

भारताला आपल्या उर्वरीत दोन सामन्यांमध्ये स्कॉटलंड आणि नामीबियाच्या विरोधात ८० धावांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवणे गरजेचे असणार आहे. पण भारताच्या विजयावरच या गोष्टी अवलंबून नाहीत. भारतीय फॅन्सला न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. न्यूझीलंडला अफगाणिस्तानच्या टीमने ५३ धावांनी पराभूत केले, तरच भारताची सेमी फायनलमधील घौडदोड कायम राहू शकते.

- Advertisement -

सेमी फायनलच्या मुद्दयावर काय म्हणाला विराट कोहली ?

टी २० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरोधातील पहिल्या विजयानंतर कॅप्टन विराट कोहलीला भारताचा सेमी फायनल गाठण्याचा प्रश्न विचारण्यात आला. या मुद्द्यावर विराट कोहली म्हणाला की, आमचे लक्ष्य हे सेमाफायन क्वालिफाय करणे हे आहे. टीम मिटिंगमध्ये आम्ही ज्या काही शक्यप्राय अशा संधी आहेत, त्या मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला यापुढे सकारात्मक रहावे लागेल असेही कोहलीने स्पष्ट केले.


हेही वाचा – Rahul dravid: राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक; न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेपासून स्वीकारणार कारभार

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -