Homeक्रीडाNitish Kumar Reddy : 'रेड्डी' है हम..., नितीश कुमारची ऑस्ट्रेलियासमोर शतकी खेळी

Nitish Kumar Reddy : ‘रेड्डी’ है हम…, नितीश कुमारची ऑस्ट्रेलियासमोर शतकी खेळी

Subscribe

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील युवा खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या नितेश रेड्डी याने ऑस्ट्रेलियासमोर शतक ठोकले.

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील युवा खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या नितेश रेड्डी याने ऑस्ट्रेलियासमोर शतक ठोकले. नितेशच्या या शतकी खेळीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. नितीश कुमार रेड्डीने 171 चेंडूत शतक पूर्ण केले आहे. (Ind vs aus 4th test nitish kumar reddy hit century in australia on 8th position)

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या होत्या. पण चौथ्या दिवसी फलंदाजीसाठी आलेला रुषभ पंत 191 धावा करत बाद झाला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी फलंदाजीसाठी मैदानात आला. सुरूवातील सावध खेळी करत नितीशने संघाची धुरा सांभाळली. पण काहीवेळाने ऑस्ट्रेलियांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार नितीश रेड्डीने घेतला.

आठव्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीने वॉशिंग्टन सुंदर सोबत चांगली भागीदारी केली आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या जीवात जीव आला. नितीश कुमार रेड्डी याने शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला आहे. आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना शतक करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी ऋद्धिमान साहाने हा पराक्रम केला होता. पण भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.

दरम्यान, 21 वर्षे आणि 216 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे. फक्त दोन खेळाडूंनी आठव्या किंवा रेड्डीपेक्षा कमी वयात फलंदाजी करत शतके झळकावली आहेत. अबुल हसन (20 वर्षे 108 दिवस) आणि अजय रात्रा (20 वर्षे 150 दिवस) यांच्यानंतर रेड्डीचा नंबर येतो.

याशिवाय, अष्टपैलू नितेश रेड्डीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलंच शतक आहे. शिवाय, नितीश ऑस्ट्रेलियात कसोटीत शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांनी ही कामगिरी केली आहे. नितीशसाठी हे शतकही खास होते, कारण त्याचे वडील पण प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहून हा सामना पाहत आहेत. वडिलांसमोर शतक झळकावल्यानंतर नितीश भावूक झाला.


हेही वाचा – Dr. Manmohan Singh : भारतीय संघाने सामना खेळताना व्यक्त केला शोक, हाताला बांधली काळी पट्टी