घरक्रीडाऑस्ट्रेलियाने अखेर मारली बाजी; ३५ धावांनी भारताची नाचक्की

ऑस्ट्रेलियाने अखेर मारली बाजी; ३५ धावांनी भारताची नाचक्की

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पाचवा एकदिवसीय सामना संपन्न झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा समाना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं होतं. या मालिकेसाठी भारताकडून दोन बदल करण्यात आले होतं. युझवेंद्र चहल आणि राहुलला या संघातून वगळण्यात आले आणि त्याजागी मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना स्थान दिले गेले होते. परंतु, तरीही भारताच्या पदरात पराजय पडला आहे. भारताचा ३५ धावांनी पराभव झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, हे आव्हान पेलताना भारताची दमछाक उडाली. अवघे शंभरीच्या आत भारताचे ३ गडी माघारी फिरले होते. त्यामुळे भारच जिंकेल अशी भारतीय क्रिकेट प्रेमींची मावळली होती. परंतु, मराठमोळ्या केदार जाधवने पुन्हा सामन्यामध्ये रंग आणला आणि जिंण्याची नवी ज्योत क्रिकेट प्रेमींच्या मनात लावली. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने पुन्हा डाव सावरला. दोघांनी मिळून ९१ धावांची भागीदारी केली. परंतु, ही जोडी तुटली आणि उरलेल्या विकेटही खिशात घालत ऑस्ट्रेलियाने मालिकेवर आपला झेंडा फडकावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -