घरक्रीडाIND vs AUS 5th T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय; मालिका 4-1...

IND vs AUS 5th T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय; मालिका 4-1 ने जिंकली

Subscribe

बेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज (3 डिसेंबर) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. भारताने याआधीच मालिका जिंकली होती, परंतु शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 6 धावांनी पराभव मालिका 4-1 ने खिशात घातली. (IND vs AUS 5th T20 Indias thrilling win over Australia Won the series)

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 55 धावांवर भारताने आपल्या 4 विकेट गमावल्या होत्या. पण श्रेयस अय्यरने भारतासाठी सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. त्याने 37 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतकीय खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावताना 160 धावांपर्यंत पोहचू शकला.

- Advertisement -

श्रेयस अय्यर सोडल्यास अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावा, जितेश शर्माने 16 चेंडूत 24 आणि यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 21 धावा केल्या. याशिवाय ऋतुराज गायकवाडने 10, रिंकू सिंग 6, सूर्यकुमार यादव 5 आणि रवी बिश्नोईने 2 धावांचे योगदान दिले. तर अर्शदीप सिंग दोन धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर, अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – Johnson vs Warner : स्कँडलमध्ये अडकलेल्या खेळाडूला हीरोसारखा निरोप का? जॉन्सनचा वॉर्नरवर निशाणा

भारताकडून मिळालेल्या 161 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेही 55 धावांवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. बेन मॅकडरमॉटने संघासाठी सर्वाधिक 54 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने 28 आणि मॅथ्यू वेडने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. टीम डेव्हिड 17 धावा करून बाद झाला तर, मॅथ्यू शॉर्ट 16 धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डीला केवळ 6 धावा तर, जोश फिलिपला केवळ 4 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 8 विकेट गमावताना 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी विकेट मिळाल्या, तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.

अखेरच्या षटकात भारताचा विजय

शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना अर्शदीप सिंग षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने भारतीय संघाला सहा धावांनी विजय मिळवून दिला. अर्शदीपने 20 व्या षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडला धावा करण्यापासून रोखले. त्यामुळे तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्ना वेड श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन बाद झाला. वेड बाद झाल्यानंतर भारताचा विजय निश्चित झाला. यानंतर अर्शदीपच्या चौथ्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फ केवळ एक धाव काढू शकला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दोन चेंडूंत नऊ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने एक धाव घेतली. त्यानंतर बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे भारतीय संघाने या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -