घरक्रीडाIND vs AUS 5th T20 : विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमावर ऋतुराज गायकवाडची...

IND vs AUS 5th T20 : विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमावर ऋतुराज गायकवाडची नजर; इतिहास घडवण्याची संधी

Subscribe

बेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज (3 डिसेंबर) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. भारताने याआधीच मालिका जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा शेवट संघ विजयाने करू इच्छितो. विशेष म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड या मालिकेत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने नुकताच कमी डावात भारतासाठी टी-20 मध्ये धावांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यानंतर आता त्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. (IND vs AUS 5th T20 Rituraj Gaikwad eyes Virat Kohlis big record A chance to make history)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावले होते. यासह तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने पाचव्या टी-20 सामन्यात आणखी 19 धावा केल्या तर तो भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – Assembly Election Result : …देशातली जनता काँग्रेसला हद्दपार करेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

विराट कोहली बऱ्याच काळापासून टी-20 फॉर्मेटमधून बाहेर आहे. भारतासाठी द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2021 साली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. कोहलीने या मालिकेत तीन अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. तर केएल राहुलने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यात 224 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता ऋतुराज गायकवाडला 19 धावा करताना या दोघांचा विक्रम मोडून अव्वल स्थानी जाण्याची संधी आहे.

- Advertisement -

पाचव्या टी-20 सामन्यात सुंदर आणि दुबेला संधी मिळण्याची शक्यता

कर्णधार सूर्यकुमार यादवने चौथ्या टी-20 सामन्यात 4 बदल केले होते. त्यामुळे पाचव्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. शेवटच्या सामन्यात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते, जेणेकरून त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी थोडा सराव करता येईल. सुंदर गेल्या काही दिवसांपासून दुखापतींमुळे त्रस्त होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघात स्थान न मिळालेल्या डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी सुंदरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. यासोबतच अष्टपैलू शिवम दुबेलाही या सामन्यात संधी मिळू शकते.

हेही वाचा – Assembly Election Result : चार राज्यांच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…; ‘मन मन मोदी’

पाचव्या टी-20 साठी दोन्ही संघाची प्लेइंग-11

भारत – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, दीपक कुमार चहर, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया – जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -