घरक्रीडाIND vs AUS पर्थ कसोटी : ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल नाही

IND vs AUS पर्थ कसोटी : ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल नाही

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. अॅडलेड येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकत चार सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या सामन्यात विजय मिळवत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल हे निश्चित. या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्यांनी संघात एकही बदल केलेला नाही. या सामन्यात अष्टपैलू मिचेल मार्शला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झालेले नाही.

- Advertisement -


ऑस्ट्रेलियाने संघात बदल केलेला नसला तरी त्यांच्या फलंदाजांच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या मार्कस हॅरिस आणि अॅरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली होती. पण दुसऱ्या सामन्यात मार्कस हॅरिससोबत उस्मान ख्वाजा किंवा शॉन मार्श सलामीला येण्याची शक्यता आहे. तर एकदिवसीय कर्णधार अॅरॉन फिंचला मधल्या फळीत खेळवले जाईल. तो स्थानिक क्रिकेटमध्ये मधल्या फळीतच खेळत असल्याने तो तिथे जास्त चांगली फलंदाजी करेल अशी ऑस्ट्रेलियाला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -